कोरोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित झाल्या आहेत. अशामध्ये अनेक क्रिकेटपटूंनी वेळ घालविण्यासाठी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी खेळाडू सोशल मीडियामार्फत लाईव्ह येत आहेत.
यामध्ये भारतीय संघाचे खेळाडू मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि रोहित शर्मासुद्धा (Rohit Sharma) चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्रामवर लाईव्ह आले होते.
यादरम्यान दोघांनी क्रिकेटबद्दल खूप चर्चा केली. तसेच शमीने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासादेखील केला. याचदरम्यान दोघांनीही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली होती.
तरीही या पूर्ण लाईव्ह चॅटमध्ये रोहितला शमीच्या घरातील लाईट गेल्यामुळे खुप त्रास झाला. खरंतर यादरम्यान तब्बल ३ वेळा शमीच्या घरातील लाईट केली होती. त्यामुळे रोहित खुप कंटाळला होता. चर्चेदरम्यान लाईट गेल्यामुळे आणि कनेक्शन तुटल्यामुळे रोहित वैतागला आणि आपल्या मुलीचे कारण देऊन निघून गेला.
जेव्हा तिसऱ्या वेळी शमीचे कनेक्शन तुटले, तेव्हा काही वेळ रोहितने त्याची वाट पाहिली. परंतु तो परत न आल्यामुळे रोहित म्हणाला की, “मी जातोय माझी मुलगी खूप रडत आहे,” असे म्हणून रोहित निघून गेला.
यादरम्यान युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मजा घेण्यास विसरला नाही. त्याने पहिल्यांदा लाईट गेल्यानंतर शमीला ट्रोल करत म्हटले की, “मेणबत्ती पाठवू काय?” तरी याचे त्याला उत्तर मिळाले नाही. रोहित गेल्यानंतर जेव्हा शमी लाईव्ह पुन्हा आला, तेव्हा चहलने त्याला सांगितले की, “रोहित निघून गेला आहे. कारण त्याची मुलगी समायरा रडत होती.” पुढे शमी म्हणाला की, “तसंही रोहितबरोबर मी आज खूप चर्चा केली आहे.”
तसेच या लाईव्ह चॅटदरम्यान शमीने आश्चर्यचकीत करणारा खुलासा केला होता. तो म्हणाला की, “मी ३ वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला होता. परंतु कुटुंबामुळे मी चूकीचे पाऊल उचलण्यापासून वाचलो होतो. २०१५मध्ये जखमी झाल्यानंतर मला पुनरागमन करण्यासाठी खूप वेळ लागला होता.”
“हा काळ माझ्या आयुष्यातील तणावपूर्ण होता. तसेच मैदानावर पुनरागमन केल्यानंतर वैयक्तिक आयुष्यातील समस्यांनी मी खूप त्रस्त होतो. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्या करण्यासारखा भयानक विचार आला होता,” असेही शमी पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पदार्पणाच्या काही दिवस आधी लाराच्या वडिलांचे झाले होते निधन, ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज स्विकारुन…
-कमेंटमुळे वैतागलेल्या रोहित शर्माने लाईव्ह सेशनदरम्यानच वापरले अपशब्द
-जर गल्ली क्रिकेट खेळला असला तर तुम्हाला शंभर टक्के माहित असणार हे २० नियम