आशिया चषक २०२२ ची सुरुवात होण्यापूर्वी एकीकडे सर्व संघ सराव सत्रात कसून घाम गाळत आहेत. तर दुसरीकडे मैदानाबाहेर क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटण्यासाठी रांगा लावत आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो सराव सत्रादरम्यान एका पाकिस्तानी चाहत्याची भेट घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
आशिया चषकातील (Asia Cup 2022) सर्वात यशस्वी भारतीय संघ २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याने अभियानाची सुरुवात करणार आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू नेट्समध्ये भरपूर मेहनत घेत आहे. मागील टी२० विश्वचषक २०२१ मधील पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा सूड घेण्याची संधी भारताकडे असणार आहे. यासाठी भारताचा कर्णधार आणि ‘हिटमॅन’ रोहितही (Rohit Sharma) मैदानात कसून सराव करतोय.
असाच शुक्रवारी (२६ ऑगस्ट) सराव करायला गेला असताना पाकिस्तानचे काही चाहते लोखंडाच्या भिंतीपलीकडे थांबून रोहितची प्रतिक्षा करताना दिसले. आपल्या प्रतिक्षेत उभा असलेल्या पाकिस्तानी चाहत्यांना रोहितनेही निराश केले नाही. तो मैदानातून बाहेर चाहत्यांजवळ गेला. रोहितला आपल्याकडे येताना पाहून चाहत्यांच्या आनंदाला सीमा नव्हत्या. रोहित जवळ येताच काही चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. काहींनी त्याच्याशी हात मिळवले.
Captain Rohit Sharma greeted some Pakistani fans on the ground. Such a lovely guy, The Hitman! pic.twitter.com/EakErJNsWt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 26, 2022
मात्र यातील एका चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधले. चाहत्यांच्या गर्दीत उभा असलेल्या एका पाकिस्तानी चाहत्याने रोहितला गळाभेट देण्याची फार विनंती केली. रोहित आणि त्या चाहत्यामध्ये लोखंडाची जाळीदार भिंत होती. तरीही रोहितने त्या जाळीतून त्या चाहत्याला मिठी मारली (Rohit Sharma Hugs Pakistani Fan). हे पाहून त्या चाहत्याला आणि खुद्द रोहितलाही हसू आवरले नाही. हा गोड क्षण कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. रोहितच्या या अंदाजावर चाहते फिदा होताना दिसत आहेत.
जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक
सर डॉन ब्रॅडमन यांच्या फलंदाजीचा ७३ वर्षे जूना रंगीत व्हिडिओ पाहिलाय का?
Asia Cup| श्रीलंका-अफगाणिस्तान संघात रंगणार ‘उद्घाटन सामना’, भारतात कुठे पाहता येईल लाईव्ह?