भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला, सोबतच 2 सामन्यांची कसोटी मालिकाही आपल्या खिशात घातली. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खूपच खूश दिसला. यादरम्यान त्याने माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याविषयी चर्चा केली.
रोहितला गौतम गंभीरबद्दल विचारले असता तो म्हणाला, “आम्ही सर्वजण पुढे जात आहोत. साहजिकच कोणत्यातरी टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांसोबत काम सुरू करायचे होते. पण राहुल भाई (राहुल द्रविड) म्हणाले की मी वेगळा होत आहे. आमचा तो वेळ खूप छान होता, पण आयुष्य पुढे जात आहे. गौतम गंभीर, मी त्याच्यासोबत खेळलो आहे आणि तो कोणत्या प्रकारची मानसिकता घेऊन येतो हे मला माहीत आहे. सुरुवातीचे दिवस आहेत, पण सुरुवात चांगली झाली आहे.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला, “आम्ही अडीच दिवस गमावले होते, जेव्हा आम्ही चौथ्या दिवशी आलो तेव्हा आम्हाला त्यांना लवकरात लवकर बाद करायचे होते आणि आम्ही बॅटने काय करू शकतो हे पाहायचे होते. जेव्हा ते बाद झाले, तेव्हा आम्ही किती धावा केल्या हे नाही, तर आम्ही त्यांना किती षटके दिली. हे महत्त्वाचे होते. खेळपट्टीत फारसे काही नव्हते. त्या खेळपट्टीवर खेळ करणे हा एक उत्कृष्ट प्रयत्न होता. ही एक जोखीम आम्ही घेण्यास तयार होतो कारण जेव्हा तुम्ही अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्ही कमी धावसंख्येवर बाद होऊ शकता. पण आम्ही 100-150 धावांवर बाद झालो तरी त्यासाठी तयार होतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: यशस्वीने 11व्या कसोटीतच केली सेहवागची बरोबरी, यादीत अन्य भारतीय नाही
IND vs BAN: टीम इंडियाने बांग्लादेशला हरवून मायदेशात साकारला सलग 18वा कसोटी मालिका विजय
खतरनाक..! टीम इंडियाचा दणदणीत विजय, बांग्लादेशच्या चारीमुंड्या चीत..! मालिका 2-0 ने खिश्यात