---Advertisement---

हिटमॅन रोहित शर्माकडून पंड्या, धवन क्लिन बोल्ड, पहा व्हीडिओ

On: सोमवार, मे 27, 2019 12:48 PM
---Advertisement---

30 मेपासून 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला इंग्लंड आणि वेल्स येथे सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी सर्व सहभागी संघ इंग्लंडमध्ये उपस्थित आहेत. या विश्वचषकासाठी खेळूडूंचे फोटोशूटही करण्यात आले आहे.

याबरोबरच आयसीसीने फोटोशूटवेळी खेळाडूंसाठी प्लेइंग झोनचीही सुविधा केली आहे. तसेच यावेळी आयसीसीने खेळाडूंशी विविधप्रकारे संवाद साधला आहे. याचे व्हिडिओही आयसीसीने सोशल मीडियावर शेअर करत आहे.

भारताचा उपकर्णधार रोहित शर्माचाही असाच एक मजेशीर व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे देताना रोहितने संघसहकाऱ्यांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या उत्तरांमध्ये हार्दिक पंड्याचे नाव बऱ्याचदा आले आहे.

संघात सर्वाधिक सेल्फी कोण काढतात, संघातील सर्वात वाईट डान्सर कोण आहे, स्वत:ला सर्वाधिकवेळा गुगल कोण करतं या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना रोहितने हार्दिकचे नाव घेतले आहे. याबरोबर सर्वाधिकवेळ फोनचा वापर कोण करतात, या प्रश्नाचे उत्तर देतानाही रोहितने कुलदीप यादवसह हार्दिकचे नाव घेतले आहे. 

याबरोबरच जेव्हा रोहितला विचारण्यात आले की नेहमी जिममध्ये कोण असते, यावर त्याने उत्तर दिले की कर्णधार विराट कोहली. तसेच रोहितला त्याचा सर्वात खराब रुममेट कोण असे विचारल्यावर त्याने शिखर धवन सर्वात खराब रुममेट असल्याचे सांगितले आहे.

त्याचबरोबर रोहितने स्वत:ला सर्वाधिक कॉफीचा चाहता असल्याचेही सांगितले आहे. तर बसमध्ये सर्वात उशिरा कोण येते, या प्रश्नावर रोहित म्हणाला, खेळाडूंपैकी कोणी नाही, पण आमचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर हे उशीरा येतात.

या विश्वचषकात भारतीय संघ पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध साऊथँम्पटनला खेळणार आहे. त्याआधी भारताने पहिला सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. या सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. आता भारताचा दुसरा सराव सामना 28 मे ला बांगलादेश विरुद्ध होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकात हा संघ ठरू शकतो ‘सरप्राईज पॅकेज’, सचिन तेंडुलकरने व्यक्त केले मत

पृथ्वी शॉची दमदार कॅप्टन्सी; जिंकले टी२० मुंबई लीगचे विजेतेपद

न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतकी खेळी केलेल्या जडेजाने भारतीय फलंदाजीबद्दल केले मोठे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment