भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून तिसरा सामना उद्या (07 ऑगस्ट) होणार आहे. मात्र तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मासह श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर खरेदी करताना दिसले. ही एकदिवसीय मालिका श्रीलंका दौऱ्यावर खेळवली जात आहे.
खेळाडूंच्या खरेदीबद्दल बोलताना, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह कोचिंग स्टाफचा भाग असलेला अभिषेक नायर देखील दिसत आहे. हा व्हिडिओ श्रीलंकेतील एका मॉलमधील असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिन्ही भारतीय खेळाडू एक्सलेटरवरून उतरताना दिसत आहेत.
Captain Rohit Sharma clicked at shopping mall at Colombo with Shreyas Iyer, Washington Sundar and Abhishek Nayar ????✨???? pic.twitter.com/rRXSuxzSBq
— ????????????????????????????⁴⁵ (@rushiii_12) August 5, 2024
यावेळी तिन्ही खेळाडू स्टायलिश लूकमध्ये दिसले. श्रेयस अय्यर पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये तर रोहित शर्मा टी-शर्ट घातलेला दिसत होता. शर्टमध्ये वॉशिंग्टन सुंदरही दिसत होता.
भारत-श्रीलंका वनडे मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा दोन्ही सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. टाय झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधाराने 58 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.
या मालिकेतील दोन सामने पूर्ण झाल्यानंतर श्रीलंका मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत संपला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे श्रीलंकेने दोन सामन्यांनंतर मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा-
सचिनच्या जिवलग मित्राची प्रकृती बिघडली; चालणे फिरणे झाले कठीण, व्हिडिओ आला समोर
बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणा बाहेर! संतप्त आंदोलकांनी माजी कर्णधाराचे घर जाळले
Paris Olympic: नीरज चोप्रासह , हॉकी टीम ॲक्शनमध्ये, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक





