आयपीएलच्या 13 व्या हंगामातील चौथा सामना काल मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघादरम्यान झाला. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 49 धावांनी विजय मिळविला.
या सामन्यात रोहितने मोलाचे योगदान दिले. त्याने 54 चेंडूत 80 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने काही विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.
आयपीएलमध्ये 200 षटकार केले पूर्ण
रोहित शर्माने या खेळीदरम्यान 3 चौकार आणि 6 षटकार लगावले. यासह तो आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणार्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणार्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने या यादीत 200 षटकार ठोकले आहेत. या यादीत भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा समावेश आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 212 षटकार ठोकले आहेत, तर सुरेश रैना या यादीत तिसर्या क्रमांकावर असून त्याने 194 षटकार ठोकले आहेत.
एकूण आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर या यादीत वेस्ट इंडिज संघातील विस्फोटक खेळाडू ख्रिस गेलचे नाव पहिल्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 326 षटकार ठोकले आहेत, तर एबी डिविलियर्स 214 षटकारांसह दुसर्या स्थानावर आहे. या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे.
‘या’ संघाविरुद्ध केल्या सर्वाधिक धावा
रोहित शर्माने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही संघाविरूद्ध तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. केकेआरविरुद्धच्या खेळीनंतर रोहित शर्माने 904 धावा पूर्ण केल्या आहेत आणि या यादीत अव्वल स्थान गाठले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध डेव्हिड वॉर्नर 829 धावा करत दुसर्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहली दिल्लीविरुद्ध 825 धावा करत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 819 धावा केल्या आहेत, तर सुरेश रैनाने केकेआर आणि मुंबई इंडियन्स विरूद्ध 818 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये हा विक्रम करण्यासाठी 10 धावांची गरज
या सामन्यात रोहित शर्मा केवळ 10 धावांमुळे आपला मोठा विक्रम होण्यापासून चुकला. जर त्याने केकेआरविरुद्ध आणखी 10 धावा केल्या असत्या, तर आयपीएलमध्ये 5000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो सामील झाला असता. आयपीएलमध्ये सुरेश रैना आणि विराट कोहली यांनी आतापर्यंत 5000 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘असा’ विक्रम करणारा मुंबई इंडियन्स ठरला पहिला संघ
-सूर्यकुमार यादव ‘अशी’ कामगिरी करणारा मुंबई इंडियन्सचा ठरला सातवा खेळाडू
ट्रेंडिंग लेख-
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज
-श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….
-आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज