भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्या दरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे. हा सामना जिंकत विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाच्या योजनेविषयी व या सामन्याच्या आपल्या रणनीतीबाबत प्रतिक्रिया दिली.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मधील पहिला सामना नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा पत्रकारांना सामोरा गेला. त्याने पत्रकारांच्या या सामन्याविषयी व मालिकेविषयी प्रश्नांची उत्तरे दिली. या सामन्याबद्दल बोलताना तो म्हणाला,
“आमची रणनीती तयार झाली आहे. संघात कोणाला संधी मिळणार याबाबत आत्ताच खुलासा करणे योग्य ठरणार नाही. मात्र, एक सर्वोत्तम संघ आम्ही मैदानावर उतरवू.”
याचवेळी रोहितला भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याची देखील आठवण आली. तो म्हणाला,
“रिषभची कमतरता नक्कीच भासणार आहे. कारण, तो संघाचा एक महत्त्वाचा भाग होता. तो फिरकीपटूंवर चांगले आक्रमण करतो तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची सरासरीही चांगली आहे. मात्र, त्याची जागा घेणारे खेळाडूदेखील तितकेच प्रतिभावान आहेत.”
रिषभचा मागील वर्षाच्या अखेरीस अपघात झाला होता. त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झालेली. याच कारणाने तो जवळपास सहा सात महिने क्रिकेट पासून दूर राहू शकतो. त्याच्याजागी या संघात केएल राहुल, केएस भरत व ईशान किशन यापैकी एक जण संघात यष्टीरक्षकाची भूमिका बजावताना दिसेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
(Rohit Sharma Speaks About Rishabh Pant Ahead Border-Gavaskar Trophy 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईट कॅमेरा ऍक्शन! कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचे फोटोशूट, नव्या जर्सीत खेळाडूंची धमाल
“अश्विनचा सामना करणे म्हणजे बुद्धिबळ खेळण्यासारखे”, नंबर वन ऑस्ट्रेलियन फलंदाजाची कबुली