डब्लिन | शुक्रवारी भारत विरुद्ध आयर्लंड दुसऱ्या टी२० सामना होत आहे. या सामन्यात दोन भारतीय फलंदाजांना टी२० कारकिर्दीत २००० धावा करण्याची संधी आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ते दोन खेळाडू आहेत.
विराटने ५८ टी२० सामन्यात ४९.५७च्या सरासरीने १९८३ धावा केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथा आहे.
रोहित शर्माने ८० टी२० सामन्यात ३१.९५च्या सरासरीने १९४९ धावा केल्या आहेत. तो देखील आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचवा आहे.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
२२७१- मार्टिन गप्टील, सामने- ७५
२१४०- ब्रेंडन मॅक्क्युलम, सामने- ७१
१९८९- शोएब मलिक, सामने- ९८
१९८३- विराट कोहली, सामने- ५८
१९४९- रोहित शर्मा, सामने- ८०
हे आहेत एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे भारतीय फलंदाज
विराट कोहली- 1983 धावा
रोहित शर्मा- 1949 धावा
सुरेश रैना- 1509 धावा
एम एस धौनी- 1455 धावा
युवराज सिंह- 1177 धावा
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट, मोठा खेळाडू करतोय पुनरागमन
-कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!