भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने त्याच्या गोलंदाजीबाबत मोठे विधान केले आहे. त्याला गोलंदाजी करण्याची इच्छा होते. त्यामुळे तो कसोटी सामन्यात कमीत कमी १० षटके गोलंदाजी करण्यासाठी नेहमी तयार असतो, असे रोहितने म्हटले आहे. Rohit Sharma wants to do bowling in test matches.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड शोमध्ये रोहितने या गोष्टीचा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, “मला माझ्या गोलंदाजीची आठवण खूप आठवण येते. जेव्हापासून माझ्या हाताच्या बोटाला दुखापत झाली, तेव्हापासून मी चेंडूला व्यवस्थित ग्रिप करू शकत नाही. त्यामुळेच मला पुर्वीसारखी गोलंदाजी करता येत नाही. याव्यतिरिक्त वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर माझी गोलंदाजी टिकू शकत नाही. म्हणून मी तिथे गोलंदाजीपासून दूर राहतो.”
रोहित पुढे बोलताना म्हणाला, “पण मी कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार असतो. कसोटीत कमीत कमी १० षटके गोलंदाजी करण्याइतपत माझी मानसिक तयारीदेखील असते. यामुळे संघातील नियमित गोलंदाजांना विश्रांतीसाठी थोडा वेळ मिळेल आणि संघाचाही फायदा होईल.”
रोहितने आयपीएलमध्ये विकेट्सची हॅट्रिक देखील घेतली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला रोहितने क्रिकेटच्या तीनही प्रकारात गोलंदाजी केली होती.
रोहित हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. तो वनडेत ३ द्विशतके करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. तसेच, २०१९मधील विश्वचषकात त्याने ५ शतके ठोकली होती, हादेखील एक विश्वविक्रम आहे. थोडक्यात रोहितला फलंदाजी करताना सर्वांनी पाहिले आहे. पण, रोहितच्या इच्छेनुसार त्याला कसोटीत गोलंदाजी करायला मिळेल का नाही? हे पाहणे रोमांचक ठरेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
केएल राहुल म्हणतो, युवीचा विक्रम मोडणार ‘हा’ खेळाडू
१ रुपयांत ३० वर्षांपासून इडली विकणाऱ्या ८५ वर्षीय महिलेचा भारतीय…
जर आयपीएल रद्द झाली तर एवढ्या मोठ्या रकमेवर सोडावे लागणार पाणी