भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेल्मेटचा वापर हा फलंदाज आणि यष्टिरक्षकातर्फे केला जात असतो. परंतु आज भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याच्याकडून स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना हेल्मेटचा वापर करताना पाहायला मिळाले.
हेल्मेट घालून स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण
रोहित शर्मा हा आपल्या धडाकेबाज फलंदाजी ओळखला जातोच. तसेच तो आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ही ओळखला जातो. त्याने स्लीप मध्ये अनेक झेल टिपले आहेत. आज स्लीपमध्ये हेल्मेट घालून त्याला क्षेत्ररक्षण करतांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र खेळपट्टीत गती कमी असल्याने बॅटच्या कडेला चेंडू लागून स्लिपपर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळेच रोहितने काहीसे पुढे येऊन उभे राहायचे ठरवले. मात्र अशावेळी योग्य संरक्षण असावे, म्हणून त्याने स्लिपमध्ये हेल्मेट घालून क्षेत्ररक्षण करणे पसंत केले.
Rohit wearing helmet in slips#RohitSharma #INDvENG pic.twitter.com/MQVKWbzMpx
— H (@_offthemark_) February 5, 2021
पहिल्या दिवस अखेर इंग्लंड संघाची सामन्यावर पकड मजबूत
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्याचा निर्णय हा इंग्लंड संघाच्या दृष्टीने योग्य होता असेच चित्र सध्या दिसून येत आहे. सलामी फलंदाजांनी संघाला चांगलीच सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार जो रूटने दमदार शतक झळकावले. रूट पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर १२८ धावांवर नाबाद खेळत आहे. तर दुसरीकडे सिबली याने ८७ धावा केल्या.
८९ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराह याने त्याला बाद केले. तसेच गोलंदाजी करतांना भारतात आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या जसप्रीत बुमराह याने २ विकेट्स घेतल्या आणि आर. अश्विन याने १ विकेट घेतला. दिवसाखेर इंग्लंड संघाच्या धावा ८९.३ षटकात, ३ बाद २६३ इतक्या धावा आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल 2021 साठीच्या लिलावात सहभागी होणार अर्जुन तेंडुलकर, इतकी असेल बेस प्राईस
मेरा नाम है वॉशिंग्टन, रिषभ पंतने भर मैदानात रचले नवीन गाणे, पाहा भन्नाट व्हिडिओ






