भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात १८ जणांना संधी देण्यात आली. यासह निवड समितीने व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्माकडे टी२० सह वनडे संघाचे नेतृत्वदेखील देऊ केले आहे. या दौऱ्यावर आता रोहित पूर्णवेळ वनडे संघाचा कर्णधार म्हणून काम पाहिल. (New ODI Captain Rohit Sharma)
निवड समितीची घोषणा
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारतीय संघाचा हा दौरा सुरू होईल. तत्पूर्वी, दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली गेली. कसोटी संघाचे नेतृत्व नियमित कर्णधार विराट कोहली करेल. मात्र, अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याची उपकर्णधार पदावरून गच्छंती झाली. त्याच्या जागी आता रोहित कसोटी संघाचा उपकर्णधारपद भूषवेल. (Ajinkya Rahane Step Down As Vice Captain)
नुकताच बनला होता टी२० संघाचा कर्णधार
टी२० विश्वचषकानंतर विराट कोहली याने टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर, उपकर्णधार रोहित शर्माची त्याच्या जागी नियमित टी२० कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली होती. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत ३-० असा विजय मिळवलेला.
https://twitter.com/BCCI/status/1468577752953483264?s=20
कर्णधार म्हणून शानदार कामगिरी
रोहित शर्मा (Rohit Sharma) हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा स्पर्धेचे विजेतेपद नावावर केले आहे. याव्यतिरिक्त त्याने अनेकदा विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या टी२० व वनडे संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने. निदहास ट्रॉफी (Nidhas Trophy) व २०१८ आशिया चषक ( 2018 Asia Cup) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन
वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पर्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पर्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केपटाऊन
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा, रहाणेची उपकर्णधारपदावरुन गच्छंती
साजिद खानने बांगलादेशी फलंदाजांची पळता भुई थोडी, पाकिस्तानचा दुसरी कसोटी जिंकत मालिकेवर कब्जा






