---Advertisement---

रोहित शर्मा सोडणार मुंबईची साथ? आयपीएल 2025 पूर्वी चर्चांना उधाण

On: गुरूवार, ऑगस्ट 29, 2024 3:46 PM
---Advertisement---

गेल्या मोसमापासून मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघात राहणार की नाही हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळवत आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्यानंतर सुरू झालेल्या गदारोळामुळे आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळणार नसल्याचे मानले जात होते. त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो हा माझा शेवटचा आहे असे म्हणत होता.

वास्तविक, आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा हार्दिक पांड्याला आपल्या संघात समाविष्ट केले. त्याला ट्रेडच्या माध्यमातून गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये आणण्यात आले होते. आतापर्यंत सर्व काही ठीक होते पण त्यानंतर हार्दिक पांड्यालाही कर्णधार बनवण्यात आले. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले. लोकांचा रोष इतका वाढला की मुंबईत हार्दिक पांड्याला मैदानात बू करण्यात आले होते. तसेच सोशल मीडियावरही त्याला खूप ट्रोल करण्यात आले.

रोहित शर्माबाबत अनेक बातम्या येत होत्या की तो मुंबई इंडियन्स सोडू शकतो. मात्र, आता सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघातच राहणार असून तो अन्य कोणत्याही संघाचा भाग नसणार आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझी रोहित शर्माची समजूत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून तो संघ सोडणार नसल्याचे बोलले जात आहे. पण यासर्व घटनांनवर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स संघारडून आधिकृत पणे कोणतेही विधान समोर आले नाही.

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. असे असतानाही मागील मोसमात त्याला अचानक कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. त्यामुळे लोकांचा रोष खूप वाढला होता. आयपीएल 2024 दरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. माझ्यासाठी हे मंदिर आहे, असे तो या व्हिडिओत सांगत होता. मी तो बनवला आहे आणि तो माझा शेवटचा आहे. हा व्हिडीओ फिरत होता की रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार नसल्याचे सांगतिले जात होते.

हेही वाचा-

“विराट कोहलीशिवाय आपण 2011 चा वर्ल्ड कप जिंकू शकलो नसतो!”, माजी खेळाडूनं स्पष्टच सांगितलं
“भारतीय संघाची काॅपी करा” माजी खेळाडूचा पाकिस्तानला टोला
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी स्टार फलंदाज करतोय गोलंदाजी! सुनील नारायणच्या स्टाईलची हुबेहूब नक्कल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---