---Advertisement---

रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत करणार ओपनिंग, मग कुणाला मिळेल डच्चू ?

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने पार पडले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ७ जानेवारीपासून पुढील तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या कसोटीतील विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन संघ दुखापतग्रस्त खेळाडूंचे पुनरागमन झाल्याने नव्या जोमाने या कसोटीत उतरेल.

अशात भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांच्या पथकात काही बदल केले जाऊ शकतात. दुखापतीतून पूर्णपणे बरे झालेल्या विस्फोटक फलंदाज रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले असून त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याचे खेळणे निश्चित आहे. परंतु रोहित या सामन्यात सलामीला उतरेल का मधल्या फळीत फलंदाजी करेल? तसेच त्याला संघात सहभागी करण्यासाठी कुणाला डच्चू देण्यात येईल?, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, रोहित नव्या चेंडूने खेळण्यात पारंगत असल्याने तो सलामीला फलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे. तसेच सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल याच्याजागी त्याला संघात सामील करण्यात येईल.

शुबमन करू शकतो रोहितसोबत डावाची सुरुवात 

आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात अगरवाल खास कामगिरी करू शकला नाही. त्याने कसोटी सामन्यांच्या चार डावात फलंदाजी करताना अनुक्रमे १७, ९, ० आणि ५ धावा केल्या आहेत. त्याच्या सुमार फलंदाजीला पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाला त्याला वगळण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. अशात रोहितसोबत युवा फलंदाज शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरू शकतो.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने सर्वांना आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ४५ धावा तर दुसऱ्या डावात ३५ धावांची मॅच विनिंग खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलम‌ॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले

काय सांगता! आयपीएलमधून माघार घेतलेला डेल स्टेन खेळणार ‘या’ टी२० टूर्नामेंटमध्ये

विराट कोहलीच्या ‘या’ फोटोवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून येतायेत मजेदार कमेंट, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---