भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी (१५ मार्च) समाप्त झाली. भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी तब्बल २३८ धावांनी विजय संपादन करत श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. पूर्णवेळ कर्णधार म्हणून प्रथमच कसोटी मालिका खेळत असलेल्या रोहित शर्मा याने या मालिकेदरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली.
१४ सामने नॉन स्टॉप विजय
टी२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी२० कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध प्रथमच पूर्णवेळ कर्णधार म्हणून टी२० मालिकेत काम पाहिले. या मालिकेत भारतीय संघाने ३-० असा विजय त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाला आधी वनडे मालिकेत ३-० व त्यानंतर टी२० मालिकेत ३-० असे पराभूत केले. श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेच्या पूर्वी झालेल्या तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने एकतर्फी यश मिळवत ३-० असा विजय साजरा केलेला. त्यानंतर आता या दोन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला पराजित करत, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग १४ सामने आपल्या नावे केले आहेत. आता भारतीय संघातील सर्व खेळाडू आयपीएल खेळताना दिसतील. यामध्ये देखील रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करेल.
भारतीय संघाचा दणदणीत विजय
मोहाली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने बेंगलोर कसोटीत खराब सुरुवात केली. भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात २५२ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या १०९ धावांवर गुंडाळला. त्यानंतर दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर व रिषभ पंत यांनी अर्धशतके करत संघाला ३०० धावांची मजल मारून दिली. भारतीय संघाने श्रीलंकेला विजयासाठी ४४७ धावांचे आव्हान दिले. मात्र, पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला नामोहरम करत २३८ धावांनी विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या-