---Advertisement---

रोहितला साध्य करायच्या होत्या ‘या’ सर्व गोष्टी, १० वर्षांपूर्वी केलेल्या संकल्पाचे जूणे ट्विट व्हायरल

On: रविवार, जानेवारी 2, 2022 11:37 AM
Rohit-Sharma
---Advertisement---

वर्ष २०२१ संपून २०२२ वर्षाला जोरदार सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात अनेकांनी संकल्प केले असतील की, येणाऱ्या वर्षात नक्की काय करायचं आहे. भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma)  देखील १०. वर्षांपूर्वी एक संकल्प केला होता. ज्याचं एक जुनं ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Rohit Sharma’s old tweet)

रोहित शर्माने २०१२ मध्ये एक संकल्प केला होता. ज्याची माहिती त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर दिली होती. त्याने २८ डिसेंबर २०११ रोजी लिहिले होते की, ” माझा नवीन वर्षाचा संकल्प असा असेल की, कुठल्याही गोष्टीला हल्ल्यात घ्यायचं नाहीये. गिटार वाजवायला शिकायचं आहे…”

https://twitter.com/ImRo45/status/151962239883165696?s=20

आता तब्बल १० वर्ष उलटून गेल्यानंतर रोहित शर्मा ‘हिटमॅन’ नावाने प्रसिद्ध झाला आहे. तो सध्या सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत टॉपमध्ये आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९२०५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची फलंदाजी सरासरी ४८.९६ ची आहे. तसेच वनडे क्रिकेटमध्ये ३ दुहेरी शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. तसेच टी२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ३१९७ धावा केल्या आहेत. तो टी२० क्रिकेटमध्ये ४ शतक झळकावणारा एकमेव फलंदाज आहे.(Rohit sharma stats)

https://www.instagram.com/p/CT6kQI_hz5a/?utm_source=ig_web_copy_link

तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. तो या स्पर्धेत देखील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याने या स्पर्धेत एकूण ५६११ धावा केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याला भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तो सध्या वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार आहे. तर कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर रोहित शर्माची निवड करण्यात आली नाहीये. सध्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे.

महत्वाच्या बातम्या :

जोहान्सबर्ग कसोटीसाठी भारतीय संघात होणार दोन बदल? अश्विन-शार्दुलचा पत्ता कट?

‘द्रविड त्या खेळाडूला पॅकेज म्हणून पाहतोय’

हे नक्की पाहा :

आफ्रिदीने विश्वविक्रम केला, तोही सचिनच्या बॅटने | When Sachin Tendulkar Helped Shahid Afridi

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---