भारतातील सर्व क्रिकेट चाहत्यांची नजर सध्या २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्यावर लागली आहे. या सामन्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडू कर्णधार रोहितला विशेष सल्ले देत आहेत. अशातंच भारताचा माजी दिग्गज खेळाडू मोहम्मद कैफने रोहितला एक विचित्र सल्ला दिला आहे. कैफने रोहितला सामन्यापूर्वीच भारताची प्लेइंग ११ जाहीर करण्याचा सल्ला दिला आहे.
कैफच्या मते यातून विरोधी संघांना एक मोठा संदेश जातो की आम्ही तयार आहोत आणि आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आता आपल्याला फक्त जाऊन सामना जिंकायचा आहे. यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दबाव तयार करण्यास मदत होते आणि सामना जिंकणे अधिक सोपे होऊन जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शतक ठोकत सलग दुसऱ्यांदा मालिकावीर बनला शुबमन, ‘बाप’माणसाला पुरस्कार केला समर्पित
‘त्याला टी२० संघात घेण्याची शक्यता नाममात्र!’ कुलदीप यादवच्या निवडीबाबत माजी दिग्गजाचे विधान