भारतीय वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने एक उत्कृष्ट सलामीवीर फलंदाज म्हणून नाव कमावले आहे. त्याने सलामीला फलंदाजी करताना अनेक मोठे विक्रम केले आहेत. पण खूप कमी लोकांना माहित आहे की २००७ ला जेव्हा रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा तो मधल्या फळीतील फलंदाज होता.
पदार्पणानंतर पुढील काही वर्षे तो मधल्या फळीतच खेळला. मात्र त्याची अपेक्षित कामगिरी होत नव्हती. त्यामुळे त्याला सुरुवातीला भारतीय संघातून वगळण्यातही आले होते. पण नंतर पुन्हा २०११ नंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. पण त्यानंतरही त्याचा फॉर्म फारसा बरा नव्हता.
साल २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान धोनीने रोहितला शिखर धवनबरोबर सलामीला फलंदाजी करण्याबद्दल विचारले. हा निर्णय रोहितच्या कारकिर्दीला वळण देणारा ठरला.
रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शिखरबरोबर सलामीला फलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. त्या दोघांच्या यशस्वी भागीदारीचा भारताने मिळवलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदामध्ये महत्त्वाचा वाटा होता. रोहितने या स्पर्धेत ५ सामन्यात २ अर्धशतकांसह १७७ धावा केल्या होत्या.
साल २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितने पुढे भारताकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये नियमितपणे सलामीला फलंदाजी केली. पण असे असले तरी रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी ५ सामन्यात सलामीला फलंदाजी केली होती. पण त्यावेळी तो नियमित सलामीवीर फलंदाज नव्हता.
त्याने १८ जानेवारी २०११ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात पहिल्यांदा सलामीला फलंदाजी केली होती. त्याच मालिकेत त्याने पुढच्या २ वनडेतही सलामीला फलंदाजी केली. पण त्या तीन सामन्यात मिळून त्याला केवळ २९ धावाच करता आल्या.
यानंतर २ वर्षांनी त्याला जानेवारी २०१३ ला इंग्लंडविरुद्ध २ वनडेत सलामीला फलंदाजीची संधी मिळाली होती. यावेळी त्याने मोहालीमध्ये ८३ धावांची खेळी केली. तर धरमशाला येथे त्याला ४ धावाच करता आल्या. त्यांनंतर रोहितने त्याचवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कार्डिफला ६ जून २०१३ ला दक्षिण आफ्रिविरुद्धच्या सामन्यापासून नियमित सलामीवीर म्हणून फलंंदाजीला सुरुवात केली.
रोहित आता एक दिग्गज सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने सलामीवीर म्हणून १४४ वनडेत ७३१६ धावा केल्या आहेत. तर २७ शतके केली आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्येही ४ शतके सलामीला फलंदाजी करताना केली आहेत. त्याचबरोबर आता रोहितने कसोटीतही सलामीला फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
– रोहित शर्माचा 37वा वाढदिवस, जाणून घ्या टीम इंडियाच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती? वर्षाला किती रुपये कमावतो ‘हिटमॅन’?
– खेळाडू म्हणून 6 पैकी 6 आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू । HBD Rohit Sharma
– रिषभ पंतचा भीषण अपघात आठवून भावूक झाला शाहरुख खान; म्हणाला, “तो मला मुलासारखा…”