दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय कर्णधार म्हणून उपस्थित आहे. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्याने पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. याआधी सर्व मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, रोहित शर्मा टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा भाग असणार नाही.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पत्रकार परिषदेत सांगितले की, जे काही माझ्यासमोर आहे, ते खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. रोहित शर्माने जे सांगितले त्यावरून हे स्पष्ट होत आहे की, तो 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात खेळू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आता रोहित शर्मा 2024चा टी20 विश्वचषक खेळतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुल (KL Rahul) याच्याबद्दल भारतीय कर्णधार म्हणाला की, “मला केएल राहुलवर विश्वास आहे. तो चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. तो कसोटीत विकेटकीपिंग करू शकतो. मला माहित आहे की, तो हे किती काळ करू शकतो.”
संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, “गेल्या 5 ते 7 वर्षांत भारतीय वेगवान गोलंदाजाने परदेशी भूमीवर चांगली कामगिरी केली आहे. आम्ही शमीला मिस करू. त्याची जागा घेण्याचा प्रयत्न तरुण खेळाडू करतील. पण आमच्यासाठी हे सोपे असणार नाही.”
तिसऱ्या गोलंदाजाबाबत भारतीय कर्णधार म्हणाला की, “प्रसीध कृष्णा (Prasidh Krishna) आणि मुकेश कुमार (Mukesh Kumar) यांनी चांगली कामगिरी केली आहे. आमच्याकडे बुमराह (Jasprit Bumrah) आणि सिराज (Mohammad Shami) आहेत. आता आम्हाला स्विंग की सीमची गरज आहे, आम्हाला कोणत्या गोलंदाजाची गरज आहे, हे आम्ही खेळपट्टी पाहून ठरवू.”
कसोटी खेळणाऱ्या संघातील खेळाडूंबाबत हिटमॅन म्हणाला की, “खेळाडूंना कसोटी खेळायची आहे, मी सर्वांच्या डोळ्यात जोश पाहिला आहे. कसोटी हा सर्वात कठीण फॉरमॅट आहे, खेळाडूंना जास्तीत जास्त कसोटी खेळायच्या आहेत.” (Rohit’s first press conference after World Cup Hints to play T20 World Cup said)
हेही वाचा
KL Rahulचा विकेटकीपिंग डेब्यू, पण पार्थिव पटेलने लुटली मैफील, चाहत्याने ट्रोल करताच म्हणाला, ‘ड्रॉप होतो…’
Video: जेमिमाच्या अँकरिंगवर स्मृती मंधानाची मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाली, ‘ओव्हर ऍक्टिंगचे पैसे…’