न्यूझीलंड संघाचा (new zealand cricket team) दिग्गज फलंदाजी रॉस टेलर (ross taylor) याने मागच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. परंतु, त्याला अजूनही तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे, असे वाटत नाही. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्या ९ जानेवारीपासून कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना टेलरच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी टेलरने खास प्रतिक्रिया दिली.
कसोटी मालिक संपल्यानंतर न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे, जी टेलरची शेवटची एकदिवसीय मालिका असेल. बांगलादेशविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यापूर्वी टेलर म्हणाला की, “मला असे वाटत नाहीय की, हा माझा शेवटचा कसोटी सामना आहे. आतापर्यंत या गोष्टीचा माझ्यावर परिणाम झालेला नाही. मला वाटत आहे की, अजून एकदिवसीय सामने खेळायचे आहे. जर हा माझ्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असता, तर नक्कीच मला वेगळे वाटले असते. माझी मुलगी अजून पाच दिवसांचे क्रिकेट समजू शकलेली नाही. मी जेव्हा बाद होता, तेव्हा ती म्हणते, चला पप्पा घरी जाऊया.”
बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना माउंट माउंगनुईमध्ये खेळला गेला होता. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघ पराभूत झाला होता. टेलरच्या मते या स्टेडियमवर त्यांचे खेळाडू अजून जास्त खेळलेले नाहीत आणि शिकत आहेत. उभय संघातील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चमध्ये ९ जानेवारीपासून खेळला जाणार आहे. क्राइस्टचर्चमधील परिस्थिती न्यूझीलंडच्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे माहीत आहे. संघातील फलंदाज आणि गोलंदाजांना या स्टेडियमवरील परिस्थितीची सवय आहे. टेलरच्या मते दुसऱ्या सामन्यात खेळपट्टीवर बाउंस असेल आणि नाणेफेक जिंकल्यानंतर ते प्रथम फलंदाजी करतील.
“याच कारणास्तव जर, आम्ही नाणेफेक जिंकली, तर आम्ही गोलंदाजी करणार नाही. जर फलंदाजी केली, तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. अनेकदा आमची खालची फळी अडचणीतून आम्हाला बाहेर काढते. त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की, २०० पेक्षा जास्त धावा कराव्या, जी चांगली धावसंख्या असेल.” असे टेलर पुढे बोलताना म्हणाला.
टेलरच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर तो न्यूझीलंड संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत १११ कसोटी सामने खेळले आहेत आणि यामध्ये ७६५६ धावा केल्या आहेत. तसेच, त्याने २३३ एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ८५७६ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘त्या’ विजयी फॉर्म्युल्यासह विराट करणार केपटाऊन कसोटीत पुनरागमन; ‘टीम इंडिया’ रचू शकते इतिहास
भारताविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकन कर्णधारच म्हणतोय, ‘सामना जिंकण्याचा योग्य मार्ग कोणता…’
व्हिडिओ पाहा –