भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना 23 ऑक्टोबर रोजी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांविरुद्धच्या या सामन्यातून टी-20 विश्वचषक 2022 हंगामाची सुरुवात करणार आहेत. या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, पण त्याआधी भारतीय चाहत्यांसाठी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण चाहत्यांना भारतीय कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानच्या जर्सीमध्ये दिसला आहे. चला तर जाणून घेऊया हा प्रकार नक्की आहे तरी काय.
रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचा दिग्गज आणि अनुभवी फलंदाज आहेच. मागच्या वर्षी विराट कोहली (Virat Kohli) कर्णधापदावरून पायउतार झाल्यानंतर रोहितला संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवले गेले. पण अशात रोहितला पाकिस्तानच्या जर्सीत पाहिल्यानंतर चाहत्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. तुम्हालाही जर हा रोहित वाटत असेल, तर जरा थांबा. कारण हा रोहित शर्मा नसून पाकिस्तान संघाचे मीडिया आणि अम्युनिकेशन विभागाचे प्रमुख आहेत.
Gabba 😎 pic.twitter.com/c53QSh6tfB
— Ibrahim Badees (@IbrahimBadees) October 19, 2022
पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापकाचा फोटो पाहून चाहत्यांना आली रोहित शर्माची आठवण –
फोटोतील पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापकाचे नाव इब्राहीम बदीस आहे, ज्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट देखील केला आहे. पाकिस्तान संघाची जर्सी आणि डोळ्यावर चश्मा असल्यामुळे ते हुबेहूब रोहित शर्मासारखे दिसत आहेत. त्यांच्या फोटोवर खूप साऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. चाहते म्हणत आहेत, इब्राहिम रोहित शर्मासारखेच दिसतात. तर रोहित पाकिस्तान संघात सहभागी झाला आहे, असेही काही चाहते मजेत म्हणत आहेत. यापूर्वी देखील भारतीय खेळाडूंंप्रमाणे हुबेहूब दसणारे अनेकजण आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराह, युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिसलणाऱ्या चाहत्यांचा देखील समावेश राहिला आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान संघातील रविवारी (23 ऑक्टोबर) होणारा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. मागच्या वर्षी यूएईत खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला होता. ही पहिलीच वेळ होती एखाद्या विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. परंतु, यावर्षी भारतीय संघ या पराभवचा बदला घेण्याच्या तयारीत असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाने ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात, वाचा पाकिस्तानविरुद्ध भारताची गोलंदाजी कशी असेल?
हार्ट ट्रान्सप्लान्ट झालेल्या महिला चाहतीने काढले धोनीचे स्केच, ‘माही’ म्हणाला, ‘हे हृदयस्पर्शी’