Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

T20 World Cup: यूएईने थांबवला नामिबियाचा विजयरथ! भारत-नेदरलॅंड्सला फायदा

T20 World Cup: यूएईने थांबवला नामिबियाचा विजयरथ! भारत-नेदरलॅंड्सला फायदा

October 20, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
UAE v NAM T20 World Cup

Photo Courtesy: Twitter/BCCI


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) सध्या पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. यामध्ये गुरूवारी (20 ऑक्टोबर) अ गटाचे सामने झाले. ज्यामधील दोन संघ सुपर 12मध्ये पोहोचले आहेत. यातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलॅंड्सचा 16 धावांनी पराभव करत सुपर 12ची फेरी गाठली. यामुळे निराश झालेल्या नेदरलॅंड्ससाठी यूएईने सुखद धक्का दिला आहे. दुसरा सामन्यात यूएईने नामिबियाला 7 धावांनी पराभूत केले. नामिबियाच्या पराभवाचा फायदा नेदरलॅंड्सला झाला तर भारतासाठीही आनंदाची बाब ठरला आहे.

नामिबियाच्या पराभवाने श्रीलंकाऐवजी नेदरलॅंड्स भारतासोबत सुपर 12च्या गट 2मध्ये सामील झाला आहे. कारण श्रीलंकेने ज्या प्रकारे खेळ केला त्यावरून तो संघ आव्हान देणारा वाटत आहे. या स्पर्धत त्यांनी पहिला सामना गमावला असला तरी नंतरचे दोन सामने सलग जिंकत सुपर 12मध्ये धडाक्यात प्रवेश केला आहे. यामुळे श्रीलंका आता थेट यजमान संघ, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड यांच्याशी भिडणार आहे.

पहिल्या फेरीच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सलामीवीर मोहम्मद वसीम याने 50 धावा, चुंदंगापोईल रिझवान याने नाबाद 43 (29 चेंडू) आणि बसिल हमीद याने 25 धावा (14 चेंडू) केल्याने यूएईने 20 षटकात 3 विकेट्स गमावत 148 धावा केल्या.

Sri Lanka and Netherlands have some massive fixtures lined up in the Super 12 after sealing their qualification 👊🏻

Check out the updated fixtures in the Super 12 👉🏻 https://t.co/VlX3uCYXxn#T20WorldCup pic.twitter.com/iUw44ur5Rp

— ICC (@ICC) October 20, 2022

लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाची सुरूवात वाईट झाली. कर्णधार गेरहार्ड एरासमन याच्यासोबत संपूर्ण वरची आणि मधली फळी लवकरच तंबूत परतली. त्यांची स्थिती 13 षटकात 69 धावांवर 7 विकेट अशी झाली होती. त्याच्याकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या डेविड विस याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 152.77च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 36 चेंडूत 55 धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि तेवढेच षटकार मारत संघाचा धावफलक हलता ठेवला. रुबेन ट्रम्पलमन 25 धावा करत नाबाद राहिला. यामुळे 20 षटकात 8 विकेट गमावत 141 धावसंख्या उभारली.

50 off 41 with the bat 🏏
1/16 with the ball ☝️

For his brilliant display in #NAMvUAE, Muhammad Waseem is the @aramco Player of the Match 👏 #T20WorldCup pic.twitter.com/pTnmwMGXX9

— ICC (@ICC) October 20, 2022

यूएईचा हा आयसीसी विश्वचषक स्पर्धांमधील पहिला विजय ठरला आहे. त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला मुहम्मद वसीम. त्याने नामिबियाच्या डावाच्या शेवटच्या षटकात एक विकेट आणि 6 धावा देत उत्तम अष्टपैलू कामगिरी केली. यामुळे तो समनावीर ठरला.

नेदरलॅंड्स, भारतासोबत सुपर 12च्या दुसऱ्या गटात आहे. या गटात पाकिस्तान, बांगलादेश, बी1 आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. यामुळे नेदरलॅंड्सचा पुढील सामना 24 ऑक्टोबरला बांगलादेश विरुद्ध आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिक आणि पंत दोघेही संघात खेळू शकतात! गावसकरांनी समजावले प्लेइंग इलेव्हनचे गणित
विराटने ‘या’ पोरीला बनवले सोशल मीडिया स्टार, एकाच फोटोमुळे झाली सगळीकडे व्हायरल


Next Post
Sachin-Tendulkar-And-Virender-Sehwag

बड्डे आहे भावाचा! सचिनने सेहवागला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, इथेही केली सिक्सर मारण्याची विनंती

Roelof van der Merwe

VIDEO | संघासाठी स्वतःच्या दुखापतीचा नाही केला विचार, वेदना होत असतानाही धावला खेळाडू

Venkatesh-Iyer

अर्रर्र! महत्त्वाच्या टी20 स्पर्धेतून बाहेर पडला 'हा' भारतीय खेळाडू, तुम्हालाही वाटेल चिंता

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143