---Advertisement---

‘धोनीनंतर कर्णधारपद सांभाळणे…’ ऋतुराज गायकवाडबाबत स्टीफन फ्लेमिंगचे मोठे विधान

On: मंगळवार, मे 19, 2026 5:10 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी ऋतुराज गायकवाडला नेतृत्वात अजून सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सीएसकेच्या खराब कामगिरीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आयपीएलमधील 63वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 180 धावा केल्या. मात्र हे लक्ष्य हैदराबादने 1 षटक राखून सहज गाठले. या पराभवानंतर फ्लेमिंग निराश दिसून आले. सामना संपल्यानंतर त्यांनी संघाच्या कामगिरीवर भाष्य करताना गायकवाड अजून शिकण्याच्या प्रक्रियेत असल्याचे सांगितले.

चेन्नई सुपर किंग्स आता ‘करो या मरो’च्या स्थितीत पोहोचला आहे. संघाला गुरुवारी गुजरात टायटन्सविरुद्धचा अखेरचा लीग सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. मात्र फक्त विजय पुरेसा ठरणार नाही. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सीएसकेला इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे.

फ्लेमिंग म्हणाला, “ऋतुराज सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. त्याने क्रिकेटमधील महान कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीकडून नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे त्याला वेळ लागणारच.”

त्यानी पुढे सांगितले, “तो आपली भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. संघातील खेळाडूंमध्येही त्याच्याबद्दल मोठा आदर आहे. तो सतत शिकत आहे आणि त्या गोष्टींची अंमलबजावणीही करत आहे. भविष्यात तो फ्रँचायझीसाठी उत्कृष्ट कर्णधार ठरेल याबाबत कोणतीही शंका नाही.”

ऋतुराज गायकवाडचा हा हंगाम फलंदाजीच्या दृष्टीने विशेष ठरलेला नाही. त्याने 13 सामन्यांत फक्त दोन अर्धशतके झळकावली असून त्याची सरासरी 29 इतकी राहिली आहे. तरीही संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरचा विश्वास कायम ठेवला आहे.

फ्लेमिंग म्हणाला, “आम्ही संघात बरेच बदल केले होते आणि हंगामाच्या सुरुवातीलाच आम्हाला माहित होते की इतर संघांच्या तुलनेत आम्ही थोडे मागे आहोत. चांगली सुरुवात झाली असती तर अधिक चांगले झाले असते, पण सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर आम्ही चांगले पुनरागमन केले, हे समाधानकारक आहे.”

याशिवाय फ्लेमिंगने हेही मान्य केले की, पिंडरीच्या दुखापतीमुळे मैदानात उतरता न आल्यानेही महेंद्रसिंग धोनी यांची डगआउटमधील उपस्थिती संघासाठी सातत्याने प्रेरणादायी ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---