भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेला 27 जूलैपासून सुरुवात होणार आहे. तर एकदिवसीय मालिकेला 2 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. टी20 मालिकेसाठी भारताची धुरा सूर्यकुमार यादव सांभाळणार आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. परंतू या मालिकेतून मराठमोळ्या रुतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) वगळण्यात आलं आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) भारतीय संघाचा भाग होता. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या 7 सामन्यात रुतुराज गायकवाडनं 356 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 71.2 राहिली आहे. तर स्ट्राईक रेट 158.7 राहिला आहे. यादरम्यान त्यानं 1 शतक तर 2 अर्धशतक ठोकले आहेत आणि तो आयसीसी टी20 क्रमवारीत 8व्या स्थानावर आहे. तरीही त्याला श्रीलंका दौऱ्यातून का वगळलं आहे? याचं कारण अजून स्पष्ट झालं नाही.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद. सिराज.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर न्याय मिळाला! कारण नसतानाही वगळलेल्या भारतीय दिग्गजाचे टीम इंडियात कमबॅक
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर…!!!
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं रचला इतिहास! 30 वर्षापूर्वीचा रेकाॅर्ड काढला मोडीत






