चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ६२ वा सामना झाला. गुजरातने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान चेन्नईकडून युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने अर्धशतकी खेळी केली. आपल्या या खेळीदरम्यान त्याने संघाचा कर्णधार एमएस धोनी याचा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट मारत, सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, त्याच्या धोनीच्या या शॉटला (New Version Of Helicopter Shot) नवे रूपही दिले.
चेन्नईच्या डावातील १२व्या षटकादरम्यान ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) हा शॉट खेळला. गुजरातचा गोलंदाज अल्झारी जोसेफच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर ऋतुराजने मिड विकेटवर चौकार खेचला. जोसेफ ऋतुराजला अधिकतर ऑफ-साईडवर चेंडू टाकत होता, इतक्यात ऋतुराजने धोनीच्या अंदाजात जोसेफचा चेंडू ऑन साईडला खेळत चौकारासाठी पाठवला.
जोसेफने चेंडू ओव्हर-पिच करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ऋतुराजने धोनीच्या (MS Dhoni) हेलिकॉप्टर शॉटला (Helicopter Shot) नव्या रूपात खेळण्याची संधी मिळाली. ऋतुराजने खालून अलगद बॅट फिरवत चेंडू शॉर्ट मिड-विकेटला मारला. तिथे कोणताही खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभा नसल्याने त्याला सहज चौकार मिळाला. या हंगामात ऋतुराजने खेळलेला हा सर्वात प्रभावी शॉट होता.
— Varma Fan (@VarmaFan1) May 15, 2022
ऋतुराजने गुजरातविरुद्धच्या या सामन्यात अर्धशतक (Ruturaj Gaikwad Half Century) झळकावले. ४९ चेंडू खेळताना त्याने ५३ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने १ षटकार आणि ४ चौकारही मारले. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दहावे अर्धशतक होते. ऋतुराजने आतापर्यंत ३५ आयपीएल सामने खेळताना १० अर्धशतके आणि एका शतकाच्या मदतीने १२०५ धावा केल्या आहेत. यात ऋतुराजच्या या हंगामातील १३ सामन्यांतील ३६६ धावांचा समावेश आहे. तसेच आयपीएल २०२१ मधील १६ सामन्यांतील ६३५ धावा व आयपीएल २०२० मधील ६ सामन्यातील २०४ धावाही सामील आहेत.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकांमध्येच चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले. यादरम्यान त्यांनी ३ विकेट्सही गमावल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टूक टूक अकादमीचे अध्यक्ष..! गुजरातविरुद्ध अर्धशतक करूनही ट्रोल झाला ऋतुराज, जाणून घ्या कारण
ये हुई ना बात! ‘मराठमोळ्या’ ऋतुराजने सचिनच्या होम ग्राउंडवरच मोडला त्याचा ‘स्पेशल’ विक्रम
गुजरातने कायम राखली विजयाची परंपरा, सीएसकेला ७ विकेट्सने झुकवले; साहा विजयाचा शिल्पकार