इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात तीनवेळा विजेतेपदक पटकावणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. याच चेन्नई संघाची गाडी यावर्षी मात्र इतर संघांच्या तुलनेत पिछाडीवर राहिली. त्यामुळे लवकरच हंगामातून त्यांचा पत्ता कटला. मात्र जाता जाता चेन्नई संघाला ऋतुराज गायकवाडच्या रुपात उभरता सितारा मिळाला.
आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला हा खेळाडू पुनरागमनानंतर सुरुवातीच्या ३ सामन्यात फ्लॉप ठरला. परंतु शेवटच्या ३ सामन्यात त्याच्या फलंदाजीने कहर केला. आता ऋतुराजने त्याच्या शेवटच्या काही सामन्यातील अफलातून फलंदाजीमागचे प्रेरणास्थान कोण होते?, हे सांगितले आहे.
सांगितला गेल्या ४ वर्षांतील प्रवास
बुधवारी (४ ऑक्टोबर) ऋतुराजने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने आपल्याला प्रेरित करणाऱ्या एमएस धोनीसोबतचा गेल्या ४ वर्षांतील प्रवास सांगितला आहे.
चेन्नईचा कर्णधार धोनीसोबतचे आपले दोन फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “मी ऑक्टोबर २०१६मध्ये पहिल्यांदा धोनीला भेटलो होतो. माझ्या पदार्पणाच्या रणजी सामन्यात आमची भेट झाली होती. त्यावेळी सामन्यादरम्यान माझ्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. धोनी तेव्हा आमच्या झारखंड संघाचा मार्गदर्शक होता. मला दुखापत झाल्याचे पाहिल्यानंतर तो स्वत: माझ्याकडे आला आणि माझ्या दुखापतीची विचारपूस केली.”
त्यानंतर थेट ऑक्टोबर २०२०विषयी बोलताना त्याने लिहिले की, “आयपीएलमधील माझ्या पहिल्या ३ सामन्यात मी खूप कमी धावा केल्या होत्या. त्यानंतर धोनी स्वत: माझ्याकडे आला आणि मला माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीविषयी बोलला. त्यानंतर पुढील ३ सामन्यात जे काही झाले ते सर्वांनी पाहिलेच आहे.”
https://www.instagram.com/p/CHKVpEfp76b/?utm_source=ig_web_button_share_sheet
ऋतुराज गायकवाडची आयपीएल कारकीर्द
आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यापूर्वी युएईला आल्यानंतर हा मराठमोळा खेळाडू कोरोनाच्या कचाट्यात सापडला होता. पुढे कोरोना संक्रमणातून बरा झाल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर चेन्नईच्या या हंगामातील शेवटच्या ३ सामन्यात त्याने सलग ३ अर्धशतक लगावली. यासह ६ सामन्यात त्याच्या खात्यात २०४ धावांची नोंद झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात बदल, रोहितला मिळणार संधी?
नाडाने घेतले केएल राहुल- रवींद्र जडेजाचे नमुने; जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख-
हैदराबादची प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री; ‘या’ ३ कारणांमुळे मुंबईचा दारुण पराभव
वनडेत १७४ चेंडूत नाबाद ३६ धावा करणाऱ्या गावसकरांनी एकदा सेहवाग स्टाईल केली होती गोलंदाजांची धुलाई
आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…