आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यातही अपेक्षा नसताना अचानक राष्ट्रीय संघाकडून बोलावणे आले तर त्या खेळाडूला आणि त्याच्या कुटुंबीयांना सुखद धक्का बसतो. नुकतेच भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात तब्बल ६ अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय पदार्पण न झालेले) खेळाडूंचा समावेश आहे. यातीलच एक नाव म्हणजे, मराठमोळा ऋतुराज गायकवाड याचे. याच ऋतुराजने पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाल्याचे वृत्त कसे मिळाले? यावेळी कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती?, याबद्दल उलगडा केला आहे.
२४ वर्षीय ऋतुराजला निवडीच्या रात्री (१० जून) अचानक आपला फोन वाजू लागल्याने आपला कोणता मित्र अडचणीत असल्यासारखे वाटल्याचे त्याने सांगितले आहे. अखेर त्याला आपल्या निवडीची माहिती काही पत्रकरांद्वारे मिळाली.
क्रिकइंफोमधील वृत्तानुसार, ऋतुराजला रात्री लवकर झोपण्याची सवय आहे. तो झोपण्यापुर्वी आपल्या मोबाईलचा डाटा बंद करतो. परंतु गुरुवारी (१० जून) रात्री त्याला भरपूर कॉल आले. त्याला वाटले की, खूप जास्त गंभीर आणि महत्त्वाचे काही असेल कोणीही जास्तीत जास्त २ वेळा त्याला कॉल करेल. परंतु त्या रात्री त्याला भरपूर कॉल आहे. त्यामुळे तो गोंधळून गेला होता.
शेवटी त्याच्या ओळखीच्या दोन पत्रकारांनी त्याला त्याच्या निवडीची बातमी सांगितली. मग त्वरित ही आनंदवार्ता आपल्या आई-वडिलांना सांगण्यासाठी ऋतुराजने त्यांच्याकडे धाव घेतली. परंतु ते दोघेही गाढ झोपेत असल्याचे त्यांना काही समजले नाही. परंतु ऋतुराजने दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले तर त्याच्या घरात गोड-धोड बनवले जात होते.
१३ जुलैपासून भारताच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर उभय संघांना ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे.
अवघ्या २ वर्षांमध्ये भारतीय संघात निवड
पुणेकर ऋतुराजला इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या २ वर्षांतच भारतीय संघात जागा मिळाली आहे. २०२० साली आयपीएलच्या यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून त्याचे आयपीएल पदार्पण झाले होते. यानंतर अवघ्या २ हंगामात तडाखेबाज प्रदर्शन करत तो भारतीय संघ निवडकर्त्यांच्या नजरेत आला आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १३ सामने खेळताना ४०० धावा चोपल्या आहेत. यात तब्बल ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही उल्लेखनीय प्रदर्शन
ऋतुराजची देशांतर्गत कारकिर्दही खूप दमदार राहिली आहे. २०१६ पासून तो महाराष्ट्र संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने २०१६ ला वयाच्या १९ व्या वर्षी महाराष्ट्राकडून रणजीमध्ये पदार्पण केले होते. तो महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने आत्तापर्यंत २१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात ३८.५४ च्या सरासरीने ४ शतके आणि ६ अर्धशतकांसह १३४९ धावा केल्या आहेत.
तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ४७.८७च्या सरासरीने ५९ सामन्यात २६८१ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ४६ टी२० सामन्यात १३३७ धावा केल्या आहेत. तसेच तो भारत अ संघाकडूनही खेळला आहे. ऋतुराज २०१९ देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया बी व दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ब्ल्यू संघाचा सदस्य राहिला आहे. त्याने भारतीय अ संघाकडून पदार्पणाचा सामना इंग्लंड लायन्सविरुद्ध (इंग्लंड अ) खेळला.
महत्त्वाच्या बातम्या-
विरेंद्र सेहवाग म्हणतो, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजामधील स्पर्धा पाहण्यास उत्सुक
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी रोहित शर्माला विरेंद्र सेहवागने दिला ‘हा’ लाखमोलाचा सल्ला