भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत हा स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर गेली काही वर्ष क्रिकेटपासून दूर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने त्याच्यावरील बंदी काढून टाकली आहे. त्यामुळे त्याने सय्यद मुश्ताक अली टी -२० ट्रॉफी स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले होते. त्यानंतर त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या लिलावासाठी देखील नाव नोंदणी केली होती. परंतु त्याचा अंतिम यादीत समावेश करण्यात आला नव्हता. नुकताच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यावरून त्याने जोरदार पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.
श्रीसंतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पाठ दाखवून उभा आहे. फोटोमध्ये त्याने जी जर्सी परिधान केली आहे. त्यामध्ये त्याचे नाव अर्धवट पुसले गेले आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून,”माझ्या जर्सीवरील नाव पुसले जात आहे. परंतु, माझ्या डोक्यातून आणि शरीरातून पुसले जाणार नाही. माझी अंतरात्मा हेच म्हणते की, मी प्रयत्न करत राहू. मला तुमची प्रार्थना आणि आशिर्वादाची गरज आहे. निवृत्ती घेण्यापूर्वी मला खूप मोठे अंतर कापायचे आहे. मी कधीही हार मानणार नाही.”
आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग प्रकरणात लावण्यात आली होती बंदी
आयपीएल २०१३ स्पर्धेत गाजलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात एस श्रीसंतचाही समावेश होता. याच कारणास्तव त्याच्यावर आयपीएल स्पर्धेत आजीवन बंदी लावण्यात आली होती. परंतु काही वर्षांनंतर केरळ उच्च न्यायालयाने त्याच्यावरची बंदी हटवली होती. श्रीसंतवर गेल्या ७ वर्षांपासून बंदी घालण्यात आली होती.(S Sreesanth instagram post went viral on social media)
https://www.instagram.com/p/CSMqi33FDKI/?utm_medium=copy_link
श्रीसंतने स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की,”मी वास्तवाबरोबर जगण्याचा प्रयत्न करत होतो पण मी आता असे करू शकत नाही. माझे पुढील धैय्य २०२३ विश्वचषक स्पर्धा खेळणे आणि भारतीय संघासाठी जे जिंकणे आहे. त्यानंतर मी निवृत्ती जाहीर करेल.” श्रीसंतने २००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला ‘जड्डू’, १५ वी धाव घेत केला मोठा पराक्रम
अँडरसन आणि सिराज आले आमने-सामने, ‘अशी’ झाली झटापट; व्हिडिओ व्हायरल
ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम! केएल राहुलला बाद करत अँडरसन बनला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज