श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंचुरीयन येथे पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंका संघावर एक डाव आणि 45 धावांनी मात केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने मालिकेत 1-0 या फरकाने आघाडी घेतली.
श्रीलंका संघातील खेळाडूंना दुखापतीने ग्रासले असल्याने पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या श्रीलंका संघात पाच खेळाडूंना दुखापत झाली आहे. ज्यामधे धनंजय डी सिल्वा दुसर्या डावात फलंदाजी करण्यासाठी सुद्धा मैदानावर उतरला नाही. श्रीलंका संघाचा दुसरा डाव लंच ब्रेकनंतर 180 धावावर आटोपला.
हे सामने विश्व कसोटी चॅम्पियनशिपचे भाग आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला या विजयामुळे 60 गुणांचा फायदा झाला आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसरा आणि शेवटचा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जाईल. या सामन्याला 3 जानेवारी पासून सुरुवात होईल.
श्रीलंका संघाकडून या सामन्यात कुसल परेरा याने 87 चेंडूत 64 धावांची खेळी केली. तर हसरंगा 53 चेंडूत 59 धावांची आक्रमक खेळी करत पराभवाचे अंतर कमी केले. इतर सहा खेळाडूंना दुहेरी धावसंख्या सुद्धा गाठू शकले नाहीत. यापैकी चार खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे श्रीलंका संघाचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजी करताना लुंगी एंगिडी, एॅनरीच नॉर्टजे, मुल्डर आणि सिपाम्ला यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात 142.1 षटकात सर्वबाद 621 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये डू प्लेसिस याने सर्वाधिक 199 धावांची दीड शतकी खेळी साकारली होती. त्याचबरोबर केशव महाराजने 73 धावांची खेळी केली होती. बावुमाने 124 चेंडूत 71 धावांची खेळी साकारली, त्याचबरोबर मार्क्रमने 94 चेंडूत 68 धावांचे योगदान दिले. श्रीलंका संघाकडून हसरंगाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा
– NZ vs PAK: न्यूझीलंडने फास आवळला, पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत