---Advertisement---

कोरोना व्हायरसचा फटका आता क्रिकेट, टेनिसपाठोपाठ बुद्धीबळ स्पर्धांनाही

On: शुक्रवार, मार्च 13, 2020 8:04 PM
---Advertisement---

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सर्व खेळांच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहेत. याबरोबरच अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघाने (AICF) कोरोना व्हायरसचा प्रसार वाढल्यामुळे सावधगिरी बाळगून सर्व राष्ट्रीय कार्यक्रम 31 मे पर्यंत रद्द केले आहेत.

एआयसीएफचे सचिव भरतसिंग चौहान (Bharatsingh Chouhan) यांनी शुक्रवारी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला (Corona Virus) साथीचा रोग जाहीर केले आहे. त्यामुळे ही स्पर्धा आयोजित करणे योग्य नाही.

आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार चौहान म्हणाले की, “जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनंतर सर्व राष्ट्रीय स्पर्धा 31 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य संघटनांनी 15 एप्रिलपर्यंत कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करू नये.” 

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा आजार घोषित केले आहे. जगातील 1.25 लाखापेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरसमुळे 4600 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अखेर ऑस्ट्रेलियाच्या त्या खेळाडूला असणारा कोरोना व्हायरसचा धोका टळला!

बीसीसीआयचा मोठा निर्णय; आयपीएल २०२० ला स्थगिती

संपुर्ण यादी: आजपर्यंतचे सर्व रणजी ट्राॅफी विजेेते व…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---