दुबईच्या मैदानावर शनिवारी (२४ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा ४३वा सामना झाला. पंजाबने हा सामना १२ धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरच्या हेल्टमेटला जोरदार चेंडू लागला होता. परंतु सुदैवाने त्याला जास्त गंभीर दुखापत झाली नाही. यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयसीसीला सामन्यादरम्यान फलंदाजांसाठी हेल्मेट अनिवार्य करण्याची विनंती केली आहे.
सचिनने सर्व क्रिकेट बोर्डांना केली विनंती
मंगळवारी (३ नोव्हेंबर) आपल्या अधिकृत अकाउंटवर सचिनने यासंदर्भात ट्विट केले. त्याने लिहिले की, “वेळेनुसार क्रिकेटला गती येत आहे पण क्रिकेटपटूंच्या सुरक्षिततेचे काय? नुकतीच आपण एक चित्तथरारक घटना पाहिली आहे, जी खूप खतरनाक ठरु शकली असती. म्हणून माझी आयसीसीला कळकळीची विनंती आहे की, त्यांनी फलंदाजांना सामन्यादरम्यान हेल्मेट अनिवार्य करावे. मग तो फलंदाज फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज कुणाविरुद्धही खेळत असो.”
आयसीसीसह सचिनने बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड अशा जवळपास सर्व मोठ्या क्रिकेट बोर्डांना टॅग केले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, सचिनने सर्व क्रिकेट बोर्डांना या प्रकरणाला गांभिर्याने घेण्याची विनंती केली आहे.
.@BCCI @CricketAus @ECB_cricket @OfficialCSA @BLACKCAPS @OfficialSLC @BCBtigers @TheRealPCB @windiescricket @ZimCricketv @Irelandcricket @ACBofficials @KNCBcricket
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 3, 2020
या घटनेने सचिनला आठवली शास्त्री-गावसरांनी घटना
शंकरच्या त्या घटनेमुळे सचिनला अशाच एका जुन्या घटनेची आठवण झाली. एका प्रदर्शन सामन्यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांचा फुलटॉस चेंडू भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना लागला होता.
.@RaviShastriOfc, this also reminded me of the time when you got hit after top edging a full toss bowled by Mr. Gavaskar during an exhibition game. That could’ve been a grave injury too but thankfully wasn’t! 🙏🏻
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 3, 2020
याविषयी सचिनने लिहिले की, “या घटनेने मला त्या प्रदर्शन सामन्याची आठवण करुन दिली. जेव्हा गावसकरांचा फुलटॉस चेंडू शास्त्रींना लागला होता. ही दुखापत गंभीर असु शकली असती, पण सुदैवाने असे काही झाले नाही.”
कधी लागला होता विजय शंकरच्या हेल्मेटला चेंडू?
पंजाब विरुद्ध हैदराबाद संघात साखळी फेरीतील ४३व्या सामन्यात ही घटना घडली होती. हैदराबादच्या डावातील १८वे षटक टाकण्यासाठी पंजाबचा युवा गोलंदाज अर्शदिप सिंग आला होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेला जेसन होल्डर एक धाव घेण्यासाठी पळाला. त्यामुळे नॉन स्ट्राईकर बाजूला असलेला विजय शंकरही एक धाव घेण्यासाठी पळाला. तेवढ्यात पंजाबच्या निकोलस पूरनने चेंडू पकडला आणि क्रिजच्या दिशेने फेकला.
पूरनने वेगाने टाकलेला तो चेंडू सरळ शंकरच्या हेल्मेटवर जाऊन लागला. त्यामुळे तो मैदानावरच दुखापतीने कळवळू लागला. त्यानंतर फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी शंकरची तपासणी केली. सुदैवाने त्याला जास्त गंभीर दुखापत झाली नसल्यामुळे तो पुढे खेळला. मात्र पुढील चेंडूवरच अर्शदिपने केएल राहुलच्या हातून शंकरला झेलबाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
गुड न्यूज.! हैदराबादविरुद्ध हिटमॅन मैदानात, रोहित शर्माची विरोधकांना जोरदार चपराक
”या’ विश्वविजेत्या कर्णधाराला मी ड्रग्स घेताना पाहिलंय’, माजी क्रिकेटपटूचा सणसणीत खुलासा
कोहली- गांगुली अडचणीत; मद्रास उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?