भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत तब्बल ५० लाखांची मदत केली आहे.
सचिनने ५० लाख रुपयांपैकी २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तर २५ लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला दिले आहे. सचिनने स्वत: मात्र याबद्दल कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. Sachin Tendulkar donates ₹50 lakh to aid COVID-19 relief efforts
“सचिनने २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तर २५ लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. तो कोरोना व्हायरसच्या लढ्यात सामील झाला आहे. दोनही सहाय्यता निधीला पैसे देण्याचा निर्णय पुर्णपणे सचिनचा होता, ” असे सुत्रांना सांगितले.
सचिनपुर्वी सौरव गांगुली, एमएस धोनी, इरफान व युसुफ पठाण, शिखर धवन व गौतम गंभीर या आजी माजी खेळाडूंनी तर मुंबई व बंगाल क्रिकेट असोशियनशनने वेगवेगळ्या मार्गानी या लढ्यात मदत केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–मदतीत मुंबईकर पुढे: मुंबई क्रिकेट संघटनेची मु्ख्यमंत्री रिलीफ फंडाला मदत
–कोरोनाविरुद्धच्या लढाईत एमएस धोनी आला पुणेकरांच्या मदतीला धावुन
–दिलदार दादा! गरीब लोकांना गांगुली वाटणार मोफत तांदूळ
–दिलदार पठाण भाऊ! लोकांना दिले एवढे मास्क
–दिलदार दादा! गरीब लोकांना गांगुली वाटणार मोफत तांदूळ
–जगातील पहिली क्रिकेट टीम, जी देणार आपला अर्धा पगार कोरोना बाधितांना