भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. साराचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. साराचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. या फोटोंची खास बाब ही आहे की, सारा यामध्ये पारंपारिक मराठी लूकमध्ये दिसत आहे. तिने मराठमोळी साडी घातली आहे आणि नाकात नथ देखील आहे.
ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) मराठमोठ्या अंदाजात दिसली आहे. व्हायरल होत असलेले फोटो तेंडुलकर कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नातील दिसत आहे. सारा आणि तिचे संपूर्ण कुटुंब या लग्नासाठी उपस्थित होते. साराने मराठमोळी साडी, गळ्यात दागिने, नाकात नथ आणि केसांना गजरा लावला आहे. या पारंपारिक वेशात तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
View this post on Instagram
सारा तेंडुलकर या नातेवाईकाच्या लग्नात हातामध्ये कलश घेऊन विधी पार पाडताना दिसत आहे. हा विधी पार पडत असताना सारासोबत अजून एक महिला देखील उपस्थित आहे. लग्न जवळच्या नातेवाईकाचे आहे, हे यावरून समजते की, सचिनसह संपूर्ण तेंडुलकर कुटुंब यासाठी उपस्थित राहिले आहे. स्वतः सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नवविवाहित जोडप्यासोबत फोटो काढताना दिसला आहे.

सचिन या लग्नप्रसंगी खूप आनंदी होता. त्याचेही मराठमोळ्या पोशाखातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्याने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. फोटोंमध्ये सचिन खूप आनंदात आणि नातेवाईकांसोबत मजा- मस्ती करताना दिसत आहे. हे लग्न मुंबईच्या जे डब्लू मॅरियट या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडले. लग्नातील हे सर्व फोटो फोटोग्राफर समीर वसाईकरने स्वतःच्या फेसबूक खात्यावरून शेअर केले आहेत.
View this post on Instagram
सारा तेंडुलकर भारतापेक्षा विदेशात जास्त काळ असते. तिने विदेशातील अनेक फोटो स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केले आहेत. आयपीएल २०२२ दरम्यान मात्र ती अनेकदा स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिली होती. मुंबई इंडियन्सने चालू हंगामात निराशाजनक प्रदर्शन केले, पण सारा आणि तेंडुलकर कुटुंब संघाला सपोर्ट करताना दिसले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्या खेळीवर टीका केली जायची, त्यामुळे मी…’, गुजरातच्या मॅचविनर पठ्ठ्याची मोठी प्रतिक्रिया
‘माणसांकडूनच चूका होतात’, गांगुलीकडून विराट-रोहितची पाठराखण
हार्दिक घसरला अन् बटलर वाचला! ‘ऑरेंज कॅप होल्डर’ जोसला मिळाले दोनदा जीवनदान






