---Advertisement---

रणजी बादशहा वसिम जाफरचा सचिन- सेहवागमध्ये हा खेळाडू आहे फेव्हरिट

On: शनिवार, जुलै 4, 2020 2:51 PM
---Advertisement---

मुंबई । भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर ही सलामीची जोडगोळ प्रसिद्ध होती. आपल्या कारकिर्दीत दोघांनीही सलामीला खेळताना तडाखेबाज सुरुवात करून दिली. दोघेही खतरनाक गोलंदाजांचा सामना करत त्यांची गोलंदाजी फोडून काढली. सर्वश्रेष्ठ सलामीचा फलंदाज म्हणून दोघांपैकी एकाची निवड करणे खूपच अवघड आहे. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर याने त्याचा आवडता फलंदाज निवडला आहे.

‘क्रिकट्रेकर’ शी बोलताना वसीम जाफरला सेहवाग-सचिन पैकी एका आवडत्या फलंदाजाची निवड करण्यास सांगितले. वसीम जाफरने सेहवागला निवडले. याचे कारणही त्याने सांगितले. सेहवागमध्ये क्रिकेट फॅन्सचे मनोरंजन करण्याची क्षमता होती. त्यामुळे त्याने सचिन ऐवजी सेहवागला निवडले.

यासोबतच वसीम जाफरला भारतीय संघातला सर्वश्रेष्ठ वनडे फलंदाज निवडण्यासाठी सांगितले. यासाठी त्याला सचिन, विराट कोहली आणि रोहित शर्मा असे तीन पर्याय देण्यात आले होते. वसीम जाफरने सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडू म्हणून विराट कोहलीला निवडले. वास्तविक पाहता, सचिन तेंडुलकर जगातला सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. मात्र त्याचा काळ वेगळा होता. सध्या विराट कोहली सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे.

जाफरने याचवर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने भारताकडून २००० ते २००८च्या दरम्यान ३१ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी त्याने ५ शतके आणि ११ अर्धशतके ठोकत १९४४ धावा केल्या. तसेच त्याने रणजी ट्रॉफी या मानाच्या स्पर्धेतही १२ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

सध्या जाफरती उत्तराखंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी –

भारतातील हे राज्य तयार करतंय जगातील तिसऱ्या क्रमांकाच सर्वात मोठं स्टेडियम, आता क्रिकेट पाहताना येणार…

आजीवन बंदी घालण्यात आलेल्या क्रिकेटरने श्रीशांत प्रकरणात बीसीसीआयला लिहीले पत्र, वाचा काय आहे प्रकरण

कुलदीपचा धोनीबद्दल धक्कादायक खुलासा, धोनीमुळे खराब झाली…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---