दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप अंतिम सामना मंगळवारी (4 जूलै) खेळला जाईल. बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून तब्बल नवव्या वेळी ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेन.
आठ संघांच्या या स्पर्धेत भारत व कुवेत यांचा एकाच गटात समावेश होता. साखळी फेरीतील सामन्यात उभय संघांमध्ये बरोबरी झालेली. भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात आघाडी घेतल्यानंतर अखेरच्या मिनिटाला कुवेत संघाकडून गोल झालेला. त्यानंतर उपांत्य फेरीचा सामन्यात भारतीय संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये लेबनॉन संघाला पराभूत केलेले. त्यानंतर आता या अंतिम सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल.
भारतीय संघासाठी आतापर्यंत या स्पर्धेत सुनील छेत्री याने कर्णधाराची भूमिका योग्य बजावत पाच गोल झळकावले आहेत. त्याला नाओरेम महेश तसेच अब्दुल समद यांनी आक्रमणात योग्य साथ दिली. या सर्व आक्रमकांकडून अंतिम सामन्यात देखील अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. यासोबतच अमरिंदर सिंग व संधू यांनी गोलरक्षक म्हणून अभेद्य कामगिरी केली आहे.
भारतीय संघाने यापूर्वी आठ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद उंचावले आहे. केवळ दक्षिण आशियातील देश या स्पर्धेत सहभागी होतात. यावेळी लेबनॉन व कुवेत हे निमंत्रित देश म्हणून स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
(SAFF Cup Final 2023 India Take On Kuwait At Bengaluru)
महत्वाच्या बातम्या –
‘ते दोघे वर्ल्ड कपमध्ये भारताचे हुकमी एक्के’, दिग्गजाने यांच्यावर खेळला दाव
अफगाणिस्तानच्या प्रमुख खेळाडूचा क्रिकेटमधून तडकाफडकी ब्रेक! वर्ल्डकपआधी संघाला मोठा धक्का