चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात शुक्रवारी (दि. 10 मे) अहमदाबादेत अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात गुजरातने चेन्नईवर 30 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अगोदर फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरातच्या सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी वादळी आणि झंझावती शतके साकारली. त्यामुळे चेन्नईचा संघ पूर्णतः दबावात आला. त्यामुळे प्रत्युत्तरात सीएसके संघ अवघ्या 196 धावा करू शकला.
चेन्नईच्या गोलंदाजांचा शुबमन गील आणि साई सुदर्शन यांनी अक्षरशः धुव्वा उडवला. साई सुदर्शनने तर 51 चेंडूत 103 धावांची खेळी करत शतक साकारले. या खेळीमुळे त्याने एक खास रेकॉर्डही बनवला. आयपीएलच्या इतिहासात आता सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा तो क्रमांक 1 चा भारतीय खेळाडू ठरला आहे. या बाबतीत साईने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाही मागे टाकले आहे.
सर्वात जलद 1000 आयपीएल धावा करणारे भारतीय (इनिंग)
25* – साई सुदर्शन
31 – सचिन तेंडुलकर
31 – ऋतुराज गायकवाड
33 – तिलक वर्मा
34 – सुरेश रैना
Special Milestone alert 🙌
1️⃣0️⃣0️⃣0️⃣ IPL runs for the elegant Sai Sudharsan 👌
Fastest Indian to reach this milestone 🥳
Follow the Match ▶️ https://t.co/PBZfdYswwj#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/oYYxD4sUXe
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024