भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शन सध्या इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ‘सरे’ संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. तेथे तो फक्त दोनच सामने खेळणार आहे. पहिल्या सामन्यात फ्लॉप झाल्यानंतर सुदर्शननं नॉटिंगहॅमशायरविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली. त्यानं सरेच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावलं.
या सामन्यात सुदर्शन सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यानं 178 चेंडूंचा सामना करत 105 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्यानं 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. काउंटी क्रिकेटमध्ये सुदर्शनचं हे पहिलं शतक आहे. सुदर्शनशिवाय संघाचा कर्णधार रोरी बर्न्सही जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्यानं 166 धावा केल्या. या दोघांच्या शतकी खेळीच्या बळावर ‘सरे’नं पहिल्या डावात 525 धावांचा डोंगर उभारला.
याआधी लँकेशायरविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात या डावखुऱ्या फलंदाजाला केवळ 6 धावा करता आल्या होत्या, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यानं आपली क्षमता दाखवून सर्वांना प्रभावित केलं. सुदर्शन यापूर्वी जूनमध्ये ससेक्सविरुद्धही खेळला होता. मात्र त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत सहभागी होण्यासाठी तो झिम्बाब्वेला गेला.
या युवा फलंदाजाच्या कामगिरीवर भारताच्या निवड समितीचीही नजर असेल. टीम इंडियाला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. सुदर्शनची कामगिरी पाहता त्याला या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळू शकतं.
निवडकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी सुदर्शनकडे दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करण्याचा पर्यायही असेल. दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होत असून, यासाठी देशांतर्गत क्रिकेटपटूंसह राष्ट्रीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंची तयारी सुरू आहे. साई सुदर्शननं भारतासाठी आतापर्यंत 3 एकदिवसीय आणि 1 टी20 खेळला असून यात त्यानं एकूण 167 धावा केल्या आहेत. मात्र त्याला अद्याप कसोटी संघात संधी मिळालेली नाही.
हेही वाचा –
दुसऱ्या कसोटीतून वगळल्यानंतर शाहीन आफ्रिदी शॉकमध्ये, पाकिस्तान संघात उभी फूट
Paris Paralympics 2024 : तिसऱ्या दिवशी भारताच्या झोळीत येऊ शकतात आणखी 4 पदकं, या खेळांतून अपेक्षा
पाकिस्तानने स्टेडियम विकले, खासगी बँकेकडून 100 कोटी वसूल; नावातही बदल होणार!