अगदी काही दिवसांपूर्वीच क्रिकेट जगतातून एक ऐतिहासिक बातमी आली. आपल्या जेंटलमन्स गेमसाठी ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक निर्णय घेतला. त्यांनी यावर्षीपासून पुरुष क्रिकेटर आणि महिला क्रिकेटर यांना एकसमान वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितले. स्त्री-पुरुष समानतेचा एक चांगला संदेश त्यांनी याद्वारे दिल्याने त्यांच्या या निर्णयाचे सबंध क्रीडाविश्वातून स्वागत करण्यात आले.
भारतात खूप आधीपासूनच प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन देण्यात यायचे. सध्या परिस्थिती बरीच बदलली आहे. तरीदेखील अनेक ठिकाणी पुरुष आणि महिला यांच्यातील वेतनात तफावत दिसून येतेच. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या या निर्णयानंतर भारतातही अशाप्रकारे निर्णय लागू करण्यात यावा अशी मागणी महिला क्रिकेटचे चाहते करू लागले. परंतु असे करण्याआधी हा देखील प्रश्न पडतो की, सध्या भारतात पुरुष क्रिकेटर्स आणि महिला क्रिकेटर्स यांच्या वेतनात नेमका किती फरक आहे?
महिला आणि पुरुष यांच्या वेतनातील फरक यावर नेहमीच चर्चा होत असते. एक मतप्रवाह असा आहे की, बीसीसीआय दोन्ही संघांचे पालकत्व घेते मग त्यांनी दोन्ही संघांना एकसमान पारड्यात तोलावे. दुसरीकडे असे म्हटले जाते, पुरुष क्रिकेटर्स अधिक प्रमाणात बीसीसीआयला फायदा मिळवून देतात. त्यांना अधिकचा वाटा मिळाल्यास हरकत काय? परंतु बीसीसीआय आयपीएलप्रमाणे महिलांची कोणतीही स्पर्धा भरवत नव्हती. मात्र, 2023पासून बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीग (Womens Premier League) सुरू केलीये. तसं पाहिलं, तर पुरुषांच्या तुलनेत महिला क्रिकेटपटू कमी प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात. त्याचा देखील परिणाम कदाचित या वेतन फरकावर होत असेल.
भारतात अधिकृतरीत्या 1973 पासून महिला क्रिकेट खेळले जातेय. त्याचवेळी भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली. मात्र, महिला असोसिएशन आणि महिला खेळाडूंना स्वतःचा खर्च स्वतः भागवायला लागायचा. त्यानंतर आयसीसीने पुढाकार घेतला आणि सर्व क्रिकेट बोर्डांना महिला बोर्डाचे सहकार्य करण्यास सांगितले. अखेर 2006 मध्ये महिला संघटनेचे बीसीसीयमध्ये विलीनीकरण करण्यात आले.
आपल्या आजच्या विषयानुसार, आपण पुरुष आणि महिला क्रिकेट यांच्यातील वेतनातील फरक पाहूया. सध्या चालू वर्षाच्या पगारापेक्षा आपण 2015-2016च्या पुरुष आणि महिला क्रिकेट कॉन्ट्रॅक्टविषयी जाणून घेऊया. त्यावर्षी पुरुष क्रिकेटर्सच्या तीन कॅटेगिरींना अनुक्रमे 1 कोटी, 50 लाख आणि 25 लाख रुपये दिले जायचे, तर महिला क्रिकेटच्या दोन कॅटेगरींना फक्त 15 लाख व 10 लाख दिले गेले. त्यानंतर त्यात थोडीफार वाढ होत गेली. आता यावर्षीच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर आपण नजर टाकू.
सध्या पुरुष क्रिकेटमध्ये चार कॅटेगरी केल्या गेल्या आहेत. ए प्लस कॅटेगरीमधील क्रिकेटर्सना 7 कोटी, ए कॅटेगरीमधील क्रिकेटर्सना 5 कोटी, बी कॅटेगरीतील क्रिकेटर्सना 3 कोटी आणि सी कॅटेगरीतील क्रिकेटर्सना 1 कोटी रुपये दिले जातात. ए प्लस ग्रेटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. आता महिला क्रिकेटच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टविषयी जाणून घेऊ. महिला क्रिकेटरच्या फक्त तीन कॅटेगिरी आहेत. ए कॅटेगरीमधील खेळाडूंना 50 लाख, बी कॅटेगरीतील खेळाडूंना 30 लाख आणि सी कॅटेगरीतील खेळाडूंना 10 लाख. महिलांच्या ए कॅटेगरीमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि पूनम यादव आहेत. म्हणजेच 2021 आयसीसीची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर असलेली स्मृती मंधाना, इंटरनॅशनल क्रिकेटमधून जवळपास बाहेर गेलेल्या वृद्धिमान साहापेक्षा वर्षाचे 50 लाख कमी कमवते.
Congratulations to @mandhana_smriti for winning the ICC Player of the Year 2021 and becoming the first Indian female player to win this award twice. She has been a trailblazer and this award is a reflection of her hard work and consistency. https://t.co/CBi6FX3kI8
— Jay Shah (@JayShah) January 24, 2022
मॅच फीसचा विचार केला, तर बीसीसीआयने महिलांसाठीही मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी पुरुष क्रिकेटर्सइतकेच सामना शुल्क महिला क्रिकेटपटूंनाही देण्याची घोषणा केली आहे. पुरुषांना टेस्ट मॅच खेळण्याचे 15 लाख, वनडेचे 6 लाख आणि टी20 चे 3 लाख मिळतात. दुसरीकडे महिलांनाही आधी कसोटीसाठी 2.5 लाख मिळायचे, ते आता 15 लाख मिळतात. तसेच, वनडेत आधी 1 लाख मिळायचे, ते आता 6 लाख मिळतात. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात आधी 1 लाखच मिळायचे, ते आता 3 लाख मिळतात.
I’m pleased to announce @BCCI’s first step towards tackling discrimination. We are implementing pay equity policy for our contracted @BCCIWomen cricketers. The match fee for both Men and Women Cricketers will be same as we move into a new era of gender equality in ???????? Cricket. pic.twitter.com/xJLn1hCAtl
— Jay Shah (@JayShah) October 27, 2022
आयपीएल आणि इतर स्पॉन्सर्सचा विचार केला तर, पुरुष क्रिकेटर्स आणि महिला क्रिकेटर्स यांच्या कमाईचे आकडे एखादा एव्हरेस्ट आणि टेकडी असे भासतात. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने नवा पायंडा पाडून चांगली सुरुवात केली आहे. मात्र, आता डब्ल्यूपीएल 2023 सुरू झाल्यामुळे या लिलावात भारतासोबतच परदेशी महिलांनीही कोट्यवधी रुपये कमावले आहेत. ही रक्कम भारतीय पुरुष खेळाडूंच्या कमाईच्या तुलनेत कमी असली, तरीही त्यामुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय गोलंदाजी फोडण्यासाठी पाँटिंगने वापरलेली स्प्रिंगवाली बॅट? खरं घ्या जाणून
बुमराहशी घेतलेला पंगा इंग्लंडला चांगलाच महागात पडला, लागोपाठ बाऊंसरचा मारा करत उडवलेली अँडरसनचीही झोप






