---Advertisement---

“अरे जसप्रीत बुमराह ‘फरारी’ आहे, फक्त सुट्टीच्या दिवशी चालवायची”

On: शनिवार, ऑक्टोबर 1, 2022 4:07 PM
Jasprit-Bumrah
---Advertisement---

भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीचा सामना करत आहे. दुखापतीमुळेच त्याला आशिया चषक 2022 मध्ये सहभाग घेता आला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने मैदानात पुनरागमन केले, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्याआधी त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. बुमराहला होणाऱ्या सततच्या दुखापतीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने खास प्रतिक्रिया दिली आहे. त्याने बुमराहची तुलना ‘फरारी’ गाडीसोबत केली आहे.

आगामी टी-20 विश्वचषक अवघ्या काही आढवड्यांवर आला असताना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतग्रस्त झाला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार बुमराह विश्वचषकात देखील खेळणार नाहीये. असे असले तरी, बीसीसीआयकडून अद्याप याबाबत कसलीही पुष्टी केली गेली नाहीये. आशिया चषकात बुमराह संघात नसल्यामुळे भारत सुपर फोर फेरीनंतर स्पर्धेतून बाहेर पडला होता. यावरून त्याचे संघातील महत्व स्पष्ट होते. अनेकांच्या मेत बुमराह भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत असल्यामुळे त्याच्यावर कामाचा तान अधिक आहे आणि याच कारणास्तव त्याला दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. सलमान बट (Salman Butt) यांचेही अगदी असेच म्हणणे आहे. त्यांच्या मते बुमराह एखाद्या महागड्या गाडीप्रमाणे आहे, जी आपण फक्त सुट्टीच्या दिवशी वापरली पाहिजे.

“बुमराहची ऍक्शन अशी आहे, ज्यामुळे त्याच्या पाठीवर जास्त भार पडतो. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळतो आणि सोबतच आयपीएल देखील खेळतो, जी खूप मोठी लीग आहे. भारताला पाहावे लागेल की, बुमराहला कोणत्या स्पर्धेत खेळवायचे आहे आणि कोणत्या नाही. बुमराह एका फरारीसारखा आहे. किंवात तुम्ही त्याला एस्टन मार्टिन किंवा लॅम्बोर्गी म्हणू शकता. या गाड्यांकडे गती आहे आणि त्यांना विकेंड कार (सुट्टीच्या दिवशी वापरणाऱ्या गाड्या) म्हटले जाते. ही तुमची टोयोटा कोरोला नाहीये, जिला तुम्ही कुठेही ड्राईव्ह कराल. विकेंड कारचा अर्थच असतो की, फक्त सुट्टीच्या दिवशीच ड्राईव्ह केले पाहिजे. बुमराहसारख्या गोलंदाजाची देखील चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. त्याला प्रत्येक सामना खेळवू नका,” असे सलमान बट म्हणाला.

दरम्यान, टी-20 विश्वचषक 16 ऑक्चोबरपासून सुरू होणार असून भारताला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. पहिल्या सामन्यात भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ असेल. बुमराह जर टी-20 विश्वचषक खेळला नाही, तर भारताला एका वेगवान गोलंदाजाची गरज भासेल, जो त्याची कमी भरून काढेल. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि दीपक चाहल यांच्यातील एकाला बुमराहच्या जागी विश्वचषक खेळण्याची संधी मिळू शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने बनवला खास प्लॅन! ते दोघे घेणार फलंदाजांची परिक्षा
‘भारताला दुसरा झहीर खान मिळालाय’, पाकिस्तानी दिग्गजाकडून अर्शदीपवर कौतुकाचा वर्षाव 
Asia Cup 2022: श्रीलंकेने जिंकला टॉस, मिताली-झुलनशिवाय पहिल्यांदाच भारत उतरणार मैदानात   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---