Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वर्ल्डकप जिंकण्यासाठी धोनी होऊ शकतो मार्गदर्शक, पण पाकिस्तानचा दिग्गज म्हणतोय, ‘भारताला याचा…’

वर्ल्डकप जिंकण्यासाठी धोनी होऊ शकतो मार्गदर्शक, पण पाकिस्तानचा दिग्गज म्हणतोय, 'भारताला याचा...'

November 17, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
MS dhoni

Photo Courtesy-Twitter/BCCI


टी20 विश्वचषक 2022 नुकताच पार पडला. या विश्वचषकात भारताला उपांत्यफेरीतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर पुढच्या टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी महेंद्र सिंह धोनी याला कोचिंग स्टाफमध्ये सामील केले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआय कोणत्या ना कोणत्या रुपात धोनीला भारतीय संघात घेण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून तो खेळाडूंमध्ये निर्भिडपणा जागा करु शकेल. सध्या भारतीय संघात याच गोष्टीची उणीव भासत आहे. त्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने धोनीची स्तुती करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्यामते बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय भारतीय संघासाठी चांगला ठरु शकतो.

या टी20 विश्वचषकातील पराभवामुळे प्रत्येक भारतीय चाहत्याला एकाच व्यक्तीची आठवण आली, तो म्हणजे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी. भारत ज्यावेळी उपांत्य फेरीच्या सामन्यात हारण्याच्या मार्गावर होता, त्यावेळी सर्व चाहत्यांच्या मनात ही एकच ईच्छा होती की धोनी या सामन्यात असायला हवा होता.

खरतर, भारतीय संघाचे प्रदर्शन मागच्या दोन विश्वचषकापासून सामन्यच आहे. 2021च्या विश्वचषकात भारतीय संघाला साखळी सामन्यातच बाहेर पडावे लागले होते आणि त्याच्यानंतर झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीतही पोहचू शकला नाही. आता 2022च्या विश्वचषकातही भारतीय संघ उपांत्यफेरीत पराभूत होऊन बाहेर पडला. अशा सामन्यात भारतीय संघाची एक कमकुवत बाजू समोर आली ती म्हणजे संघ दबावात असल्यावर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासाळतो. मोठ्या सामन्यांमधला दबाव संघातील खेळाडूंना हाताळता येत नाहीत.

एमएस धोनी बद्दल जर बोलायचे झाले तर, त्याने एक कर्णधार म्हणून आपल्या कारकीर्दीत एकूण 3 आयसीसी चषक जिंकले आहेत. हा कारनामा करणारा तो एकमेव कर्णधार आहे. याच कारणामुळे त्याला कोचिंग स्टाफच्या भुमिकेत संघात स्थान देण्याची चर्चा होत आहे. एका माध्यम संस्थेच्या अहवालानुसार बीसीसीआयमध्ये चर्चा होत आहे की, धोनीला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने टी20संघाचा भाग बनवण्यात यावे, जेणेकरून तो आयसीसी स्पर्धांमध्ये मोकळेपणाने कसे खेळावे हे शिकवू शकेल.

धोनी सोबत असल्याने भारतीय संघाला फायदा होणार- सलमान बट
पाकिस्ताान संघाचा माजी कर्णधार सलमान बट याने म्हटले आहे की धोनी सोबत असल्याने भारतीय संघाला याचा फायदा होईल. ज्या प्रकारचा तो कर्णधार आहे त्यानुसार तो संघाला उत्तम प्रकारेे मार्गदर्शन करु शकतो. भारतीय संघासाठी सर्वात चांगली रणनिती बनवू शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या तिसऱ्या जागेचा प्रश्न मिटवण्यासाठी ‘हे’ 3 धुरंधर सज्ज, वादळी खेळीने पाडू शकतात धावांचा पाऊस
ऑस्ट्रेलियात लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या दानुष्का गुणथिलकाला जामीन मंजूर, न्यायालयाच्या ‘या’ अटी मात्र पाळाव्या लागणार


Next Post
Narayan Jagadeesan

'या' खेळाडूला डावलणे सीएसकेला महागात पडणार! विजय हजारे ट्रॉफीत कुटले सलग तिसरे शतक

Steven Smith Jos Buttler

ऑस्ट्रेलियाने विश्वविजेत्यांना चारली धूळ, पहिल्या वनडेत इंग्लंडचा दारूण पराभव

Photo Courtesy: Twitter/BCCI Domestic

त्रिपाठी-बच्छावच्या कामगिरीने महाराष्ट्राची मुंबईवर मात; यशस्वीचे शतक व्यर्थ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143