भारतीय संघाचा विस्फोटक खेळाडू विराट कोहली याने रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) इडन गार्डन्स मैदानावर धावांचा पाऊस पाडत शतक झळकावले. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील 49वे शतक होते. या शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 326 धावा केल्या. हे आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिका संघ 83 धावांवर सर्वबाद झाला. यानंतर विराटला शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विराटने हे शतक ठोकताच सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाची बरोबरी केली. अशात सचिनचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
विराटचे शानदार शतक
विराट कोहली याने या सामन्यात भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 121 चेंडूंचा सामना करत नाबाद 101 धावा केल्या. या खेळीत 10 चौकारांचाही समावेश होता. विराटने हे शतक ठोकताच सचिन तेंडुलकर याच्या वनडेतील 49 शतकांची बरोबरी केली. त्यामुळे आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम संयुक्तरीत्या विराट आणि सचिनच्या नावावर आहे.
सन 2012मधील व्हिडिओ व्हायरल
अशात सन 2012मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सचिनला प्रश्न विचारताना दिसत आहे. ज्यावर सचिननेही उत्तर देत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे नाव घेतले. सलमानने प्रश्न विचारला होता की, “तुला काय वाटतं, तुझा विक्रम कुणी मोडू शकेल का?” यावर उत्तर देत सचिन म्हणतो की, “कदाचित याच रूममध्ये बसलेले तरुण खेळाडू.” यावर सलमान म्हणतो, “चान्सच नाही.” मात्र, सचिन पुढे बोलत म्हणतो की, “मला दिसत आहेत ते युवा खेळाडू.” त्यावर सलमान म्हणतो की, “कोण आहेत?” यानंतर सचिन म्हणतो की, “विराट आणि रोहित ते खेळाडू आहेत.”
Sachin Tendulkar had predicted this way back in 2012 about #ViratKohli and #RohitSharma ????????
– God of Cricket for a reason ????????????#INDvsSL #CWC23 pic.twitter.com/WGzCui4clN
— Ishan Joshi (@ishanjoshii) November 2, 2023
अशाप्रकारे सचिन जे 2012मध्ये बोलला होता, ते विराटने 11 वर्षांनंतर खरं करून दाखवलं. आता विराटला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी फक्त एका शतकाची गरज आहे. भारतीय संघाला पुढील सामना नेदरलँड्सविरुद्ध 12 नोव्हेंबर रोजी खेळायचा आहे. तसेच, भारत उपांत्य सामन्यातही खेळणार आहे. अशात विराटकडे पुढील दोन्ही सामन्यात आपले 50वे शतक पूर्ण करण्याची संधी आहे. (Salman Khan asked question to Sachin Tendulkar and he had predicted this way back in 2012 about Virat Kohli and Rohit Sharma)
हेही वाचा-
लाजीरवाण्या पराभवानंतर टेम्बा बावुमाची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘विराट आणि श्रेयस…’
पाच बळी घेऊनही सामनावीर न ठरल्यानंतर जडेजा म्हणाला, ” या खेळपट्टीवर तुम्ही…”