---Advertisement---

भारताविरुद्धची ९५ धावांची झुंज अपयशी ठरली, पण सॅम करनच्या नावावर झाला ‘मोठा’ विश्वविक्रम

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ धावांनी विजय मिळवला आहे. यासोबतच भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर ३३० धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने ३२२ धावा केल्या .या सामन्यात इंग्लंड संघाकडून सॅम करनने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. यासोबतच त्याने ख्रिस वोक्सच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाकडून डेव्हिड मालन आणि सॅम करन यांना वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. सॅम करनने या सामन्यात झुंज देत ९ चौकार आणि ३ षटकारांचा मदतीने नाबाद ९५ धावांची खेळी केली.

यासोबतच त्याने वनडे क्रिकेटमध्ये ८ व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याच्या ख्रिस वोक्सच्या विश्वविक्रमची बरोबरी केली आहे. ख्रिस वोक्सने श्रीलंकेविरुद्ध नॉटिंगघम येथे २०१६ साली ८ व्या क्रमांकावर खेळताना नाबाद ९५ धावांची खेळी केली होती. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आंद्रे रसल आहे. त्याने २०११ साली भारताविरुद्ध ८ व्या क्रमांकावर खेळताना नाबाद ९२ धावांची खेळी केली होती.

वनडे क्रिकेटमध्ये ८ व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावांची खेळी करणारे फलंदाज
१)सॅम करन – (९५* धावा) इंग्लंड
२)ख्रिस वोक्स -(९५* धावा) इंग्लंड
३)आंद्रे रसल- (९२* धावा )वेस्ट इंडीज
४)नाथन कुल्टर नाईल – (९२ धावा )ऑस्ट्रेलिया
५)रवी रामपाल – (८६* धावा)वेस्ट इंडिज

महत्त्वाच्या बातम्या –

‘ही’ गोष्ट घडली म्हणून जोफ्रा आर्चरने आयपीएलमधून घेतली माघार; वाचा काय आहे कारण

आयपीएल स्पर्धेनंतर ‘या’ देशामध्येही एबी डिविलियर्सची पाहायला मिळणार चौफेर फटकेबाजी

हार्दिक पंड्याचा कहर!!! मोईन अलीच्या एकाच षटकात लगावले ३ गगन चुंबी षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---