आयपीएल 2023 च्या 21 व्या सामन्यात लखनऊ सुपर जांयंट्स आणि पंजाब किंग्ज संघ आमने सामने आहेत. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक पंजाबने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवनला सरावादरम्यान दुखापत झाल्यानंतर सॅम करन या सामन्यात पंजाबचे नेतृत्व करत आहे. यासोबतच पंजाब आयपीएल इतिहासात सर्वाधिक कर्णधार बदलणारा संघ देखील ठरला.
आयपीएलच्या नव्या हंगामात पंजाब किंग्स संघ शिखर धवनच्या नेतृत्वात उतरला आहे. पहिल्या चार सामन्यात पंजाब ने दोन विजय व दोन पराभव असे कामगिरी केली. चौथ्या सामन्यात शिखरला छोटीशी दुखापत झाल्याने या सामन्यात तो खेळू शकला नाही. त्याच्या जागी इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यासोबतच करन पंजाबचा 15 वा कर्णधार ठरला. आयपीए मध्ये सर्वाधिक कर्णधार बदलणारा संघ देखील पंजाबच बनला.
किंग्स इलेव्हन पंजाब या नावाने खेळणाऱ्या संघाचे नेतृत्व आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामात भारताचा अष्टपैलू युवराज सिंग याने केले होते. त्यानंतर श्रीलंकेचे दोन दिग्गज कुमार संगकारा व माहेला जयवर्धने यांनी ही जबाबदारी सांभाळली. 2011 ते 2013 या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऍडम गिलख्रिस्ट याने संघाची धुरा वाहिली. त्याच्या अनुपस्थितीत काही सामने डेव्हिड हसी संघाचा कर्णधार होता. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली याने संघाचे यशस्वी नेतृत्व करत संघाला पहिल्या व अखेरच्या वेळी अंतिम फेरीत नेले होते. त्यानंतर काही काळ वीरेंद्र सेहवाग संघाचा कर्णधार राहिला. मुरली विजय डेव्हिड मिलर व ग्लेन मॅक्सवेल यांनी देखील प्रत्येकी एक हंगाम संघाचे नेतृत्व केले.
पंजाबने 2018 मध्ये संघाची धुरा अनुभवी फिरकीपटू रविचंद्र अश्विनकडे सोपवली. त्यानंतर सलग तीन वर्ष केएल राहुल संघाचा कर्णधार राहिला. मागील वर्षी मयंक अगरवालकडे ही जबाबदारी देण्यात आलेली. तर, यंदा शिखर व करन संघाचे नेतृत्व करत आहेत.
(Sam Curran is Punjab’s 15th captain the most for a franchise)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रायगड मराठा मार्वेल्स विरुद्ध पालघर काझीरंगा रहिनोस सामना बरोबरीत
रेलीगेशन फेरीत नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाचा दुसरा विजय