भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला निवडकर्त्यांकडून पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 22 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. सोमवारी (18 सप्टेंबर) या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित झाला, ज्यामध्ये संजू सॅमसन याचे नाव नव्हते. चाहते सॅमसनला संघात घेतल्यानंतर नाराजी व्यक्त करतात, पण यावेळी स्वतः सॅमसन देखील संघ व्यवस्थापनावर नाराज दिसत आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून त्याने ही नाराजी व्यक्त केली आहे.
संजू सॅमसन () भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आहे. मात्र, अनेकदा संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचेच दिसते. आगामी वनडे विश्वचषक आणि नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात देखील सॅमसनकडे दुर्लक्ष केले गेले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेत त्याला संघात संधी मिळेल, अशी अपेक्षा चाहत्याची होती. पण यावेळीही चाहत्यांची निराशा झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनेड मालिकेसाठी संघात निवड न झाल्याने स्वतः सॅमसन देखील नाराज आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक खास पोस्ट करून ही नाराजी व्यक्त केली.
सॅमसनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून फलंदाजी करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “जे आहे ते आहे! मी पुढे चालत राहील.” सॅमसनच्या या पोस्टवर अवघ्या काही मिनिटांमध्ये चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला गेला. या पोस्टआधी सॅमसनने आपल्या फेसबूक पोस्टवरून स्माईली पोस्ट केली होती. सूर्यकुमार यादवने कितीही कठीण परिस्थितीत हसत राहिले पाहिजे, असे या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Samson’s post went viral after being ignored by selectors and team management)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! ‘जेंटलमन’ चेतेश्वर पुजारा काऊंटी स्पर्धेतून सस्पेंड, वाचा कारण
वर्ल्डकपआधी वाढली दक्षिण आफ्रिकेची चिंता! एकसाथ दोन वेगवान गोलंदाज जखमी