भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ची सुरुवात विजयाने केली. भारताला कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानसोबत विश्वचषक अभियानाची सुरुवात करायची होती. रविवारी (23 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 4 विकेट्स राखून विजय मिळवला. विराट कोहली त्याच्या नाबाद 82 धावांच्या खेळीनंतर सामनावीर ठरला. अनेकांच्या मते विराटची ही खेळी भारतीय संघासाठी टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. पण भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मते विराटची ही खेळी सर्वोत्तम नाहीये.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारताला 160 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे भारताने शेवटच्या चेंडूवर गाठले. विराट एकूण 53 चेंडू खेळला आणि 82 धावा करून शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला. हार्दिक पंड्या प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये महत्वपूर्ण योगदान देऊ शकला. भारताने या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेऊन पाकिस्तानला मर्यादित धावसंख्येवर रोखले. प्रत्युत्तरात हार्दिकने 37 चेंडूत 40 धावा करत विराटला चांगली साथ दिली. विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात सर्वोत्तम फलंदाजी करणारा ठरला असला, तरी संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्या मते युवराज सिंगची 2007 टी-20 विश्वचषकातील खेळी यापेक्षा चांगली होती.
संजय बांगर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होते. आकाश चोप्राने त्यांना प्रश्न विचारला की, तुमच्या मते टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी कोणत्या फलंदाजाने सर्वोत्तम खेळी केली आहे. यावेळी चोप्राने त्यांना तीन पर्याय दिले. त्यातील दोन पर्याय विराट कोहलीचे होते, तर एक पर्याय युवारज सिंगचा होता. विराटने रविवारी पाकिस्तानविरुद्ध 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. अगदी त्याच पद्धतीने त्याने टी-20 विश्वचषक 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 चेंडूत 82 धावा केल्या होत्या. ही दोन्ही सामन्यांमधील विराटचे प्रदर्शन बांगर यांना पर्याय म्हणून दिले होते. पण त्यांनी निवडली ती म्हणजे युवराज सिंगची खेळी.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये 2007 साली झालेली ही लढत टी-20 विश्वचषकाचा उपांत्य सामना होता. युवराज सिंग या सामन्यात अवघे 30 चेंडू खेळला आणि 70 धावांची वादळी खेळी केली. हा सामना दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला होता. बांगरांच्या मते युवारची ही खेळी भारतीय संघाच्या टी-20 इतिहासातील सर्वोत्तम खेळी आहे. रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळताना विराटने केलेल्या नाबाद 82 धावा बांगरांच्या मते भारतासाठी दुसरी सर्वोत्तम खेळी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘अश्विनने माझे ऐकले नाही!’, मॅच विनिंग शॉटविषयी विराट कोहलीचा मोठा खुलासा
पावसाबरोबर क्विंटन डी कॉकही बरसला झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर! टी20 वर्ल्डकपचा ‘बलाढ्य’ रेकॉर्ड केला नावावर