भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी हा सामना संपवला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने शानदार शतकी खेळी केली. आक्रमण व संयम यांचा योग्य वेळ साधलेल्या या खेळीचे भारताचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी कौतुक केले आहे.
नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 177 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या दिवशी 1 बाद 77 धावा काढल्या होत्या. रोहितने 69 चेंडूवर नाबाद 56 धावा पहिल्या दिवशी केलेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याने संयम दाखवत 177 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. यामध्ये 14 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी रोहितने आपल्या कारकिर्दीतील नवव्या शतकात 120 धावा केल्या. यामध्ये 15 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 9 वे शतक ठरले.
त्याच्या या खेळीचे कौतुक करताना संजय बांगर म्हणाले,
“रोहित शर्माने मला त्याच्या भक्कम बचावाने चेतेश्वर पुजाराची आठवण करून दिली. पुजाराने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात ज्याप्रकारे हरवले. अगदी त्याचप्रकारे रोहितने फिरकीपटूंचा सामना करत ही खेळी केली.”
पुजाराने 2017 व 2021 दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना भारताच्या दोन्ही मालिका विजयांमध्ये त्याने मोलाचा वाटा उचलला होता.
(Sanjay Bangar Said Rohit Sharma Remind Me Cheteshwar Pujara Bat In Australia Tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! पंतच्या लेटेस्ट फोटोवर गर्लफ्रेंड ईशा नेगीने ओवाळून टाकला जीव, पाहा मन जिंकणारी कमेंट
अभिमानास्पद! ‘ही’ महिला बनली टी20 विश्वचषकात मैदानावर पंचगिरी करणारी पहिलीच भारतीय; जाणून घ्याच