भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्याच्या स्थितीत असताना पाचव्या दिवशी (८ ऑगस्ट) पावसाने खोडा घातला. परिणामी एकही चेंडू टाकला गेला नाही. त्यामुळे पंचांनी हा सामना अनिर्णीत घोषित केला.
तसेच दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हेनची निवड केली आहे.
सोनी स्पोर्ट्सवर चर्चा करताना माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हेन कशी असावी याबाबत भाष्य केले. त्यांनी पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या रवींद्र जडेजाला संघात स्थान दिले नाही. त्यांनी मुख्य फलंदाजी क्रमात कुठलाही बदल केला नाही. यामध्ये त्यांनी केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना संधी दिली आहे.(Sanjay Manjrekar picks his prefferd Indian eleven for 2nd test against England)
तसेच त्यांनी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतला आपल्या प्लेइंग इलेव्हेनमध्ये स्थान दिले आहे. रिषभ पंतबद्दल बोलताना ते म्हणाले की, “जर रिषभ पंतने ७ व्या क्रमांकावर फलंदाजी केली तर तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो. कारण तो मोकळेपणाने आणि आक्रमक फलंदाजी करू शकेल.”
तसेच त्यांनी या संघात हनुमा विहारीला देखील स्थान दिले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, हनुमा विहारीने आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात चांगली फलंदाजी केली होती.
या गोलंदाजांना दिली संधी
गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी रवींद्र जडेजा ऐवजी आर अश्विनला संधी दिली आहे. त्यांचे असे मत होते की, “पहिल्या कसोटी सामन्यात देखील आर अश्विनला संधी द्यायला हवी होती.” तसेच वेगवान गोलंदाजीसाठी त्यांनी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना प्लेइंग इलेव्हेनमध्ये संधी दिली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संजय मांजरेकर यांनी निवडलेली प्लेइंग इलेव्हेन
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत(यष्टीरक्षक), आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह
महत्वाच्या बातम्या:
‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर
आयपीएल २०२१: चौथ्या जेतेपदासाठी सीएसकेची तयारी सुरू, ऋतुराजसह ‘हे’ शिलेदार पोहोचले चेन्नईत
कोच राहुल द्रविड बनले ‘कन्नड टिचर’, चक्क ब्रिटिश उच्चायुक्ताला दिले धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल