माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केएल राहुलची कसोटी संघात निवड केल्यामुळे निराशा व्यक्त केली आहे.
बीसीसीआयने सोमवारी (२६ ऑक्टोबर) येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे, टी२० आणि कसोटी संघांची निवड केली होती. त्यातील मर्यादित षटकांच्या संघात राहुलची उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर कसोटी संघात त्याला फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे. पण बीसीसीआयचा हा निर्णय मांजरेकरांना मात्र आवडलेला नाही.
केएल राहुलच्या निवडीवर व्यक्त केली निराशा
यासंदर्भात ट्विट करत त्यांनी लिहिले आहे की, “जर तुम्ही आयपीएलमधील प्रदर्शनाच्या आधारावर कोणत्या खेळाडूची कसोटी संघात निवड करात असाल, तर हे पुर्णपणे चुकीचे आहे. त्यातही तुम्ही निवडलेला खेळाडू यापुर्वीच्या काही कसोटी सामन्यात अयशस्वी ठरला आहे. अशी निवड करुन तुम्ही रणजीपटूंना निराश करत आहात.”
एवढेच नाही तर, मांजरेकरांनी राहुलची मागील ५ कसोटी मालिकांची फलंदाजी सरासरी ट्विटमध्ये दिली आहे आणि राहुलला नशिबवान असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिले की, “केएल राहुल खरच खूप नशिबवान आहे. त्याचे आयपीएल आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आकडेवारीच्या आधारावर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. आता मी फक्त एवढीच अपेक्षा करतो की, त्याने या संधीचा पूरेपुर फायदा घ्यावा.”
KL Rahul in his last 5 Test series
– v SA – Avg 7.1
– v Eng – Avg 29
– v WI at home – Avg 18
– v Aus – Avg 10.7
– v WI – Avg 25.4
I say very lucky to get a recall based on IPL & white ball performance. But now let’s just hope he makes the most of this chance. Good luck to him! https://t.co/YBVbeut5jH— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) October 27, 2020
कसोटी क्रिकेटची आकडेवारी
कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत एकूण ३६ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३४.५९च्या सरासरीने २००६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ऑगस्ट २०१९ला वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
आयपीएल २०२०ची आकडेवारी
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्या आयपीएल २०२०मधील प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं तर, तो सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १२ सामने खेळले असून १ शतक आणि ५ अर्धशतकांच्या मदतीने ५९५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितच्या फॅन्सला ‘ही’ गोष्ट समजणे गरजेचं, माजी क्रिकेटपटूचे संघव्यवस्थापनावर ताशेरे
भल्याभल्या क्रिकेटरला घाम फोडणारा गोलंदाज संपुर्ण कारकिर्दीत होता डिप्रेशनमध्ये
ट्रेंडिंग लख-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी