भारत आणि श्रीलंका संघात १८ जुलैपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. या वनडे मालिकेत ३ सामने होतील. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. भारतीय संघाने आपापसात सराव सामने देखील खेळले आहेत. या सराव सामन्यात काही युवा खेळाडूंनी दम दाखवला आहे. दरम्यान, या सराव सामन्यांतील संजू सॅमसनच्या फलंदाजीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेनंतर टी२० मालिकाही होणार आहे. या मालिका अगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जात आहेत. कारण, टी२० विश्वचषकापूर्वी भारताच्या या अखेरच्या मर्यादीत षटकांच्या मालिका आहेत. या मालिकांमधून टी२० विश्वचषकासाठी दावेदारी ठोकण्यासाठी अनेक युवा खेळाडू सज्ज आहेत
त्याचप्रमाणे संजू सॅमसनही या मालिकेतून चांगल्या कामगिरीसह भारतीय संघात जागा पक्की करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, मालिकेआधी भारतीय संघाने आपापसात खेळलेल्या सराव सामन्यादरम्यान संजू सॅमसनने तडाखेबंद फलंदाजी केली. तो सर्व गोलंदाजांनावर तुटून पडताना दिसला होता.
त्याच्या फलंदाजीचा व्हि़डिओ राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संजू सॅमसन भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, नवदीप सैनी या गोलंदाजांच्या विरुद्ध दमदार फटके मारताना दिसत आहे.
https://twitter.com/rajasthanroyals/status/1415908182262616066
आयपीएलमध्ये केले होते शतक
संजू सॅमसन यावर्षी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. आयपीएल २०२१ चा हंगाम स्थगित होण्यापूर्वी संजू सॅमसनने ७ सामन्यांत १४५.७८ च्या स्ट्राइक रेटने २७७ धावा केल्या होत्या. त्यात एका शतकाचाही समावेश होता. हा उर्वरित हंगाम सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-श्रीलंका संघातील पहिल्या वनडेत येणार का पावासाचा व्यत्यय? पाहा काय आहे हवामानाचा अंदाज
तब्बल ११० किलो वजनाच्या आजम खानने केले आंतरराष्ट्रीय पदार्पण, पण पहिल्याच सामन्यात झाला प्रचंड ट्रोल
चर्चा तर होणारच! संघ हरला, पण नागवराच्या सेलिब्रेशनने वेधले सर्वांचेच लक्ष, व्हिडिओ भन्नाट व्हायरल






