---Advertisement---

असे 5 खेळाडू, ज्यांनी IPLमध्ये हैदराबादविरुद्ध केल्यात सर्वाधिक धावा; संजू 208 धावांनी विराटच्या पुढे

On: रविवार, मे 7, 2023 9:43 PM
Sanju-Samson
---Advertisement---

रविवारी (दि. 7 मे) आयपीएल 2023मधील 51 आणि 52 हे दोन्ही सामने खूपच खास ठरले. कारण, या दोन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघांनी 200हून अधिक धावांचा आकडा पार केला. आयपीएल 2023चा 52वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या. या धावांमध्ये संघाचा कर्णधार संजू सॅमसन याचाही सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे, हैदराबादविरुद्ध त्याने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंदही केली आहे.

काय आहे संजूचा विक्रम?
राजस्थानने डावातील पाचव्या षटकातील सहाव्या चेंडूवर यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याच्या रूपात 54 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर संजू सॅमसन (Sanju Samson) हा तिसऱ्या स्थानी फलंदाजीला उतरला. संजूने यावेळी जोस बटलर याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची वादळी भागीदारी रचली. यामध्ये बटलरच्या 82, तर संजूच्या 52 धावांचा समावेश होता. यानंतर संजू डाव सावरत शेवटच्या चेंडूपर्यंत टिच्चून खेळला. त्याने यावेळी 38 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. त्याने या धावा करताना 4 चौकार आणि 5 षटकारांची बरसात केली. विशेष म्हणजे, संजूने आयपीएलमधील 300 चौकारही पूर्ण केले.

संजूने 66 धावा करताच तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. संजूने हैदराबादविरुद्ध आतापर्यंत 777 धावा केल्या आहेत. संजूनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याने हैदराबादविरुद्ध 569 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त 566 धावांसह शेन वॉटसन तिसऱ्या स्थानी आहे, तर 549 धावांसह अंबाती रायुडू चौथ्या आणि 540 धावांसह एबी डिविलियर्स पाचव्या स्थानी आहे.

विशेष म्हणजे, संजू सॅमसन आणि दुसऱ्या क्रमांकावरील विराट यांच्यात तब्बल 208 धावांचे अंतर आहे. म्हणजेच, संजू या विक्रमात विराटच्या पुढे आहे. (Sanju Samson has Most runs against SRH in IPL)

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
777 – संजू सॅमसन
569 – विराट कोहली
566 – शेन वॉटसन
549 – अंबाती रायुडू
540 – एबी डिविलियर्स

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आला अन् साहाला थेट तंबूतच पाठवलं; धुरंधराच्या कॅचचा ‘हा’ व्हिडिओ लगेच पाहा
उलटी पॅन्ट घालून रिद्धिमान साहा मैदानात, जाणून घ्या का घडला हास्यास्पद प्रकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---