गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ गडी राखून पराभूत करत आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघातील मुख्य फलंदाज अपयशी ठरल्यानंतर ख्रिस मॉरिस आणि डेविड मिलर यांनी चौफेर फटकेबाजी करत राजस्थान संघाला सामना जिंकवून दिला. पहिल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला होता. दुसऱ्या सामन्यात मॉरिसच्या जबरदस्त खेळीनंतर आता सॅमसनने याबाबत आपले मत मांडले आहे.
पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता.२ चेंडूवर ५ धावांची गरज असताना संजू सॅमसनने धाव घेण्यास नकार दिला होता. पुढे शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाल्याने राजस्थानने सामना गमावला होता.
आता दिल्लीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर या गोष्टीवर प्रकाश टाकत सॅमसन म्हणाला, “सामन्यानंतर नेहमीच मी शांत बसून माझ्या खेळाचे पुनरावलोकन करतो. परंतु मला मागील सामन्याती प्रसंगावरुन आढळून आले की, मला तो सामना १०० वेळेस जरी खेळायला दिला, तरी मी १०० वेळेसही ती १ धाव घेण्यासाठी नाहीच म्हणेल.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आमच्याकडे तीन डाव्या हाताचे गोलंदाज आहेत, जो आमचा मजबूत पक्ष आहे. हे इतर संघांपेक्षा काही वेगळे आहे. पण आम्ही यांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करत आहोत.”
तसेच सॅमसननने शेवटी सांगितले, “सामन्यादरम्यान एक वेळ आम्हाला असे वाटत होते की, आम्ही पराभूत होऊ. परंतु मला जिंकण्याची आशा होती. आमच्याकडे डेविड मिलर आणि ख्रिस मॉरिस सारखे फलंदाज होते. खर सांगू तर मला वाटत होतं की, इथून जिंकणे कठीण आहे. परंतु आमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. हे सर्व परिस्थितीला समजून घेण्यावर होते. सुरुवातीला चेंडू थांबून येत होता. यामुळेच आम्ही हार्ड लेंथ वर गोलदाजी करून गतीमध्ये परिवर्तन केले ज्याचा आम्हाला फायदा झाला.”
महत्त्वाच्या बातम्या-
अटीतटीच्या लढतीनंतर राजस्थानची विजयाची नौका पार, कर्णधाराने ‘या’ खेळाडूंना म्हटले विजयाचे शिल्पकार
RRvDC: ‘असे’ केले दिल्लीच्या फलंदाजांना बाद होण्यास प्रवृत्त; ‘सामनावीर’ जयदेव उनाडकटचा उलगडा
धोनी तो धोनीच! ‘माही’च्या स्टाईलमध्ये पंतचा फलंदाजाला यष्टीचीत करण्याचा प्रयत्न अन्.., बघा व्हिडिओ